28 October 2020

News Flash

एअर इंडियाची विक्री ऐरणीवर

केंद्रीय अर्थखात्यामार्फत एअर इंडियातील हिस्सा विक्रीचा नवीन प्रस्ताव तयार केला जात असल्याचे कळते.

| June 20, 2019 03:54 am

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव नागरी हवाई वाहतूक कंपनीच्या विक्रीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली नव्याने सत्तारुढ झालेल्या सरकारने असा अंतिम प्रस्ताव तयार केला आहे.

केंद्रीय अर्थखात्यामार्फत एअर इंडियातील हिस्सा विक्रीचा नवीन प्रस्ताव तयार केला जात असल्याचे कळते. यानुसार कंपनीतील सरकारचे संपूर्ण अथवा ७६ टक्के भागभांडवल कमी केले जाण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर खनिज तेलाच्या किंमती, परकीय चलनातील अस्थिरता या अनुषंगाने ‘ईवाय’ने (पूर्वाश्रमीची अर्न्‍स्ट अँड यंग) व्यक्त केलेल्या चिंतेबाबतही ठोस पाऊल उचलण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.

एअर इंडियाच्या पर्यायी यंत्रणेसमोर (एअर इंडिया स्पेसिफिक अल्टर्नेटिव्ह मॅकेनिझम) याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय अर्थखाते ठेवणार असल्याचे समजते. अर्थमंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री हे या यंत्रणेत सहभागी आहेत.

सुमारे ५५,००० कोटी रुपयांचे कर्ज असलेल्या एअर इंडियाच्या हिस्सा विक्रीचा प्रयत्न यापूर्वी सरकारने केला होता. मात्र सल्लागार म्हणून प्रयत्नरत ईवायला यश मिळाले नाही. कंपनीला तारण्यासाठी आर्थिक सहकार्य देण्याचे धोरणही यानंतर सरकारने आखले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2019 3:54 am

Web Title: finance ministry to prepare fresh proposal for air india sale
Next Stories
1 जेट एअरवेज दिवाळखोरीप्रकरणी आज सुनावणी
2 विकासदर अतिरंजित दाव्याचे सरकारकडून खंडन
3 ‘वन बीकेसी’ची निम्मी मालकी ब्लॅकस्टोनकडे
Just Now!
X