05 April 2020

News Flash

क्षेत्रीय ग्रामीण बँकांना अर्थसहाय्य

नव्या वित्त वर्षांसाठी ४५ बँकांना सरकारचे ६७० कोटींचे पुनर्भाडवल

संग्रहित छायाचित्र

क्षेत्रीय ग्रामीण बँकांसाठी केंद्र सरकारने ६७० कोटी रुपयांचे अर्थ सहाय्य उपलब्ध करून दिले आहे. येत्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या नव्या वित्त वर्षांसाठी सरकारचे हे पुनर्भाडवल उपलब्ध होणार आहे.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील अर्थविषयक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबचा निर्णय घेण्यात आला. या बँकांना निर्धारित केलेल्या भांडवल उभारणीसाठी ही रक्कम उपयोगी होईल. वित्त वर्ष २०१९-२० व २०२०-२१ साठी या बँकांना निर्धारित ९ टक्के भांडवल पर्याप्तता प्रमाण राखता येण्यासाठी ही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये केंद्र सरकारचा ५० टक्के हिस्सा आहे. ३५ टक्के हिस्सा प्रायोजित बँक व उर्वरित हिस्सा संबंधित राज्य सरकारचा आहे.

क्षेत्रीय ग्रामीण बँक कायदा १९७६ नुसार, क्षेत्रीय ग्रामीण बँकेची स्थापना करण्यात ंआली आहे. छोटे शेतकरी, कृषी क्षेत्रातील कामगार तसेच ग्रामीण भागातील खातेदार, ग्राहकांना विविध वित्त सेवा पुरविण्यासाठी या बँकेची स्थापना करण्यात आली. देशात विविध ४५ क्षेत्रीय ग्रामीण बँका आहेत. २००५ मध्ये देशातील क्षेत्रीय ग्रामीण बँकांची संख्या १९६ होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 12:27 am

Web Title: finance to the regional rural banks abn 97
Next Stories
1 राज्य कर्मचारी विमा योजना सदस्य संख्येत जानेवारीत वाढ
2 शेअर बाजार सावरला, सेन्सेक्समध्ये १८०० पेक्षा जास्त अंकांची वाढ
3 निर्देशांक घसरणीला चाप
Just Now!
X