News Flash

तेलदर स्थिरावल्याने सेन्सेक्सच्या घसरणीला पायबंद!

खनिज तेल दराने गुरुवारी भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.

आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा उसळलेल्या खनिज तेल दराने गुरुवारी भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. यामुळे गेल्या सलग तीन व्यवहारांपासून घसरत असलेल्या निर्देशांक घसरणीला पायबंद बसला. जवळपास शतकाहून अधिक ११५.११ अंश वाढीने सेन्सेक्स २४,३३८.४३ वर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४२.२० अंश वाढ नोंदली गेल्याने निर्देशांक ७,४०४ वर बंद झाला. गेल्या तीन व्यवहारात मुंबई निर्देशांकाने ६४७.३७ अंशांची घसरण नोंदविली आहे. गुरुवारी मात्र वाढत्या तेल दराबरोबरच अमेरिकी फेडरल रिझव्र्हमार्फत व्याजदर वाढीच्या आशेवर बाजारात तेजीचे व्यवहार झाले.
संसदेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम जाहीर होण्याबरोबरच वस्तू व सेवा कर तसेच बँक दिवाळखोरविषयक विधेयके संसदेच्या येणाऱ्या अधिवेशनात पारित होतील, असा विश्वास सरकार पातळीवर व्यक्त केल्यानेही बाजाराला भरते आले. मुंबई निर्देशांकाचा गुरुवारचा प्रवास २४,५१४.०१ पुढे गेला, तर निफ्टीला त्याचा ७,४०० पुढील प्रवास पुन्हा नोंदविता आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2016 5:48 am

Web Title: financially stable despite low oil prices
टॅग : Oil Prices
Next Stories
1 रस्ते, रेल्वे, ऊर्जा क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला साद
2 भारतीय ग्राहकांसाठी दोन नव्या मोबाईल फोनचे जागतिक अनावरण
3 ‘एमसीएक्स’ला अॅसोचॅमचा पुरस्कार
Just Now!
X