06 July 2020

News Flash

वित्तीय तूट ४.६ टक्क्यांवर

गेल्या वित्त वर्षांत महसुली वित्तीय तुटीचे प्रमाण ३.२७ टक्के  राहिले

संग्रहित छायाचित्र

 

महसुलातील रोडावत्या उत्पन्नाचा  फटका वाढत्या वित्तीय तुटीला बसला आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात गेल्या वित्त वर्षांत ही तूट थेट ४.६ टक्क्यांपर्यंत झेपावली आहे.

देशाचे उत्पन्न व खर्च यांतील दरी मानली जाणारी वित्तीय तूट गेल्या वित्त वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत ३.८ टक्के  राखण्याचे लक्ष्य सरकारने निर्धारित के ले होते. प्रत्यक्षात तूट २०१९-२० मध्ये पुढे गेली आहे.  गेल्या वित्त वर्षांत महसुली वित्तीय तुटीचे प्रमाण ३.२७ टक्के  राहिले. परिणामत: ही तूट २.३६ टक्के आहे.

आर्थिक वर्ष २०१९-२० साठीचा अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्तीय तूट ३.८ टक्के  असेल, असे जाहीर केले होते. आधी वर्तविण्यात आलेल्या ३.३ टक्के  अंदाजापेक्षा हा अंदाज वाढविण्यात आला होता. सरकारला अपेक्षित असलेल्या महसुली उत्पन्नापैकी ९० टक्के च महसूल गेल्या वित्त वर्षांत प्राप्त झाला आहे. या माध्यमातून १९.३१ लाख कोटी रुपये येणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात १७.५० लाख कोटी रुपये महसुली उत्पन्न झाले. आधीच्या २.४ टक्के  अंदाजापेक्षा महसुली तूटही वाढून ३.२७ टक्के  झाली आहे.

प्रमुख पायाभूत क्षेत्रात घसरण

देशाच्या प्रमुख पायाभूत क्षेत्रात चालू वित्त वर्षांच्या पहिल्याच महिन्यात मोठी घसरण नोंदली गेली आहे. आठ विविध निर्मित वस्तूंचा समावेश असलेल्या या क्षेत्राचा एप्रिल २०२० मधील प्रवास मासिक तुलनेत तब्बल ३८.१ टक्क्यांनी खाली आला आहे. या क्षेत्राची वाढ मार्चमधील ९ टक्यांच्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमध्ये ५.२ टक्यांवर येऊन ठेपली आहे.

आधीच्या महिन्यात देशभरात लागू झालेल्या टाळेबंदीचा फटका प्रमुख पायाभूत क्षेत्राला बसला आहे. या क्षेत्रात कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, इंधन शुद्धीकरण उत्पादने, खते, स्टील, सिमेंट तसेच ऊर्जा यांचा समावेश होतो. गेल्या महिन्यात त्यातही कोळसा, सिमेंट, स्टील, नैसर्गिक वायू, खनिज तेल या उत्पादनांना अधिक फटका बसल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या याबाबतच्या आकडेवारीवरून दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 2:07 am

Web Title: fiscal deficit rises to 4 6 per cent abn 97
Next Stories
1 बाजार-साप्ताहिकी : दूरदर्शी उत्साह
2 सेन्सेक्स ३२ हजारांपार
3 सरकारी कंपन्यांकडून अधिकाधिक धन‘लाभांशा’चा सरकारचा मानस
Just Now!
X