News Flash

विकास दरात होणार मोठी घट, फिचने दिली चिंता वाढवणारी बातमी

करोना व्हायरसमुळे आधीच अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.

करोना व्हायरसमुळे आधीच अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. आता फिच या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने चिंतेत भर घालणारी बातमी दिली आहे. फिचने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दरात आणखी घट वर्तवली आहे. भारताचा आर्थिक विकास दर ०.८ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. तीन आठडयांपूर्वी याच फिचने भारताचा आर्थिक विकास दर दोन टक्के राहिल असे म्हटले होते.

जागतिक मंदीचे स्वरुप आणखी गंभीर होणार असल्याचा फिचचा अंदाज आहे. २०२० मध्ये चीनची अर्थव्यवस्था ०.७ टक्क्यांनी वाढेल. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने २०२०-२१ मध्ये भारताचा विकास दर १.९ टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता. त्याच काळात जागतिक बँकेने भारताचा विकासदर १.५ ते ४ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

२०१९-२० मध्ये ग्राहकांचे खर्च करण्याचे प्रमाण ५.५ टक्के होते. ते घसरुन २०२०-२१ मध्ये ०.३ टक्के होईल असा फिचचा अंदाज आहे. भारतच नव्हे तर अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, जपान या जगातील सगळयाच प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थांना करोना व्हायरसचा मोठा आर्थिक फटका बसेल असा अंदाज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2020 2:49 pm

Web Title: fitch slashes india growth forecast yet again pegs it at 0 8 for fy21 dmp 82
Next Stories
1 महागाई भत्त्याचा अतिरिक्त हफ्ता रखडला; केंद्र सरकारनं घेतला मोठा निर्णय
2 फेसबुक-जिओ करारामुळे तीन कोटी छोट्या किराणा दुकानांना होणार फायदा : मुकेश अंबानी
3 ‘यूएफओ मुव्हीज’ची १५० कोटींची उलाढाल ठप्प
Just Now!
X