गेल्या काही दिवसांपासून ठेवींवरील व्याज दरात कपात होऊ लागली आहे. असे असले तरी मुद्दल आणि परताव्याची निश्चित हमी अशा वैशिष्टय़ांमुळे मुदत ठेवी या गुंतवणूकदारांसाठी भविष्यातही पसंतीचा गुंतवणूक पर्याय राहील याची खात्री आहे. समभाग आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीला वाढत्या प्राधान्याच्या  स्थितीतही हा प्रवाह टिकून राहील काय?

अनिश्चित व्याजदराच्या नव्या फेरबदलांनंतरही मुदत ठेवी या ग्राहकांसाठी सर्वाधिक महत्त्वाच्या गुंतवणूक पर्यायांपकी एक आहेत. याचे प्राथमिक कारण परताव्याची हमी हे आहे. रकमेच्या ९० टक्क्यांपर्यंत कर्ज देण्यासाठी मुदत ठेवींची तारण म्हणून स्वीकारार्हता आणि लवचीक परिपक्वतेचा पर्याय यामुळेही या पर्यायात गुंतवणूकदारांचे स्वारस्य कायम आहे.

व्याज दर :

सामान्यत: असे म्हटले जाते की, आपले वित्तीय आरोग्य गुंतवणुकीची वैविध्यपूर्णतेतून प्रतििबबित होते आणि त्यामुळे मुदत ठेवींची उत्पादने विविध दीर्घकालीन आणि लघुकालीन वित्तीय उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी आणणे ही गोष्ट स्पष्टच आहे.

एक गुंतवणूक पर्याय म्हणून मुदत ठेवी व्याज दरावर अवलंबून असतात. मुदत ठेवींमध्ये गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेली रक्कम वेगवेगळ्या कालावधींमध्ये लहान-लहान रकमांमध्ये विभाजित करणे सुयोग्य आहे. त्यामुळे गुंतवणुकींचे संरक्षण व्याज दरातील चढ-उतारांपासून होईल आणि त्यातील गुंतवणूकदारांना या ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय दिला जातो आणि त्यातून गुंतवणूकदारांसाठी उत्पन्नाचा नियमित प्रवाह मिळू शकेल.

ठेवींवर अधिक व्याज दर मिळवण्यासाठी आपण मुदत ठेवींचा विचार केला पाहिजे. या प्रकारात व्याज दर कमी कालावधीनंतर चक्रवाढ दराने प्रत्येक तिमाहीअंतर्गत चक्रवाढ व्याज पद्धतीमध्ये मोजले जातात. कंपन्या, बिगरबँकिंग वित्त कंपन्या आणि गृहवित्त कंपन्यांकडून स्थिर ठेवींचा विचार करण्याबरोबरच हे होते. बिगर बँकांकडून जारी केलेल्या मुदत ठेवी त्यांच्या व्यवसायाचा प्रकार, व्यवसायाचे स्थर्य, त्यांची सेवासाखळी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे पतमानांकन इत्यादींचा विचार करून त्यानंतर घेतल्या पाहिजेत. पतमानांकनाचा या कंपन्यांनी दिलेल्या मुदत ठेवींवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही; परंतु गुंतवणूकदार आणि ठेवीदारांसाठी एखाद्या संस्थेची विश्वासार्हता गुंतवणूक करण्यापूर्वी तपासण्याची ही एक पद्धत आहे.

अतिरिक्त फायदा :

कॉर्पोरेट कंपन्या आपल्या ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी विविध प्रकारच्या मुदत ठेवी योजना सुरू करतात. यातून गुंतवणूकदारांच्या विविध वर्गाना सेवा दिली जाते. या मुदत ठेवी आकर्षक व्याज दर देतात आणि त्या ग्राहकांच्या आवडीच्या सुयोग्य प्रक्रियांमधून व तंत्रज्ञानातून येतात. अशा अनेक उत्पादनांसोबत विविध प्रकारची वैशिष्टय़े असतात. ज्यामुळे आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीत रोख रक्कम मिळते आणि त्याचबरोबर सर्वोत्तम व्याज दरही मिळतात. यातील काही उत्पादने जसे रुग्णालयात दाखल करण्याचे फायदे, विविध वैद्यकीय सेवांवर ५ टक्क्यांपासून ते २५ टक्क्यांपर्यंत सवलती, अहोरात्र वैद्यकीय सेवा, तज्ज्ञांच्या चमूकडून मोफत दुसरे मत इत्यादींसोबत येतात.

कॉर्पोरेट कंपन्या विविध प्रकारची आणि आखणीबद्ध केलेल्या ठेव पर्यायांसोबत येत असून त्या विविध प्रकारच्या ग्राहकांसाठी आहेत. जसे व्यक्ती, कंपन्या, सोसायटय़ा, क्लब आणि विश्वस्त आणि त्यांचा कालावधी १२ ते १२० महिन्यांचा असतो. हे महिलांसाठी विशेष मुदत ठेव उत्पादनांसह तसेच वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी मोफत अपघाती मृत्यू विम्यासह आहे.

स्थिर मुदत ठेवींचे क्रेडिट रेटिंग अनेकदा जास्त असते आणि ही उत्पादने विशिष्ट प्रमाणात लवचीकता देतात. काही कॉर्पोरेट कंपन्या एटीएम-कम डेबिट कार्डही मुदत ठेवीतील गुंतवणुकीवर काही मर्यादांसह देतात; त्यासाठी अतिरिक्त खर्च येत नाही.

करप्रणाली :

मुदत ठेवींवर व्याज उत्पन्न इतर स्रोतांपासून उत्पन्नाखाली करपात्र आहे आणि गुंतवणूकदारांना ते ज्या करांच्या टप्प्यात येतात, यावर आधारित कर भरावा लागतो. मुदत ठेवींपासून येणारे व्याज उत्पन्न वार्षिक १०,००० रुपयांपर्यंत करातून आणि या मर्यादेवरील उत्पन्नाला कर वजावट स्रोत (टीडीएस) बँकांकडून पॅन तपशील उपलब्ध असल्यास १० टक्क्यांपर्यंत आणि पॅन तपशील उपलब्ध नसल्यास थेट २० टक्क्यांपर्यंत वजा केले जाते.

ज्या मुदत ठेवीधारकांकडे करपात्र उत्पन्नाचा वर्ग नाही ते १५जी हे घोषणापत्र सादर करून ‘टीडीएस’ टाळू शकतात. हे ६० वर्षांखालील व्यक्तींकडून, विश्वस्त इत्यादींकडून केले जाऊ शकते. तसेच ज्येष्ठ नागरिक फॉर्म १५एच भरून कमावलेल्या व्याजावरील सवलती प्राप्त करू शकतात. त्यामुळे त्यांना प्राप्तिकर विवरणपत्र भरत असताना पुनर्परतावा मागण्याची प्रक्रिया टाळणे शक्य होते.

मुदत ठेवींपासून कमावलेल्या व्याजावर करबचत करण्याचा प्रयत्न करत असलेल्या गुंतवणूकदारांकडे कलम ८०(सी) अन्वये स्थिर ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय असतो. निवडक बँका ही सवलत देतात आणि गुंतवणूकदार पाच वर्षांच्या कालावधीसाठी एक लाख रुपयांपर्यंत मुदत ठेवी देऊ शकतो. अशी गुंतवणूक कलम ८०(सी) अन्वये करपात्र उत्पन्नातून वजावटीसाठी पात्र असते.

निष्कर्ष :

मुदत ठेवी या एक स्थिर आणि निश्चित परतावा प्राप्त करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय आहेत. हा दर महिन्याला एक स्थिर नियमित उत्पन्नाची हमी देण्याचा एक चांगला पर्याय आहे. भारतीय वित्तीय यंत्रणेत तुम्हाला स्थिर परतावे देणारे मर्यादित उत्पादन पर्याय आहेत आणि मुदत ठेवी त्यांच्यापकी एक आहेत. धोका टाळू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा आज उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम गुंतवणूक पर्यायांपकी एक आहे.

(लेखक डीएचएफएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)