05 August 2020

News Flash

छोटय़ा कारागिरांना बाजारसंधी; फ्लिपकार्टकडून ‘समर्थ’ उपक्रम

बाजारसंधींअभावी पिछाडीवर पडलेल्या या समुदायाला यामुळे राष्ट्रीय बाजारपेठेचे दरवाजे खुले होणार

‘समर्थ’ उपक्रमाच्या घोषणेप्रसंगी, केंद्रीय अर्थ व कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि फ्लिफकार्टचे मुख्य कार्यकारी कल्याण कृष्णमूर्ती.

नवी दिल्ली : छोटे कारागीर, विणकर आणि हस्तकारागिरांना ई-व्यासपीठ मिळवून देणारा ‘फ्लिपकार्ट समर्थ’ नावाचा उपक्रम फ्लिपकार्टकडून सुरू करण्यात आला आहे. बाजारसंधींअभावी पिछाडीवर पडलेल्या या समुदायाला यामुळे राष्ट्रीय बाजारपेठेचे दरवाजे खुले होणार असून ई-व्यापाराच्या वैशिष्टय़ांचा फायदा करून घेतानाच देशभरातील १५ कोटींहून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे.

केंद्रीय अर्थ व कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत ‘फ्लिपकार्ट समर्थ’चे नवी दिल्ली येथे अनावरण करण्यात आले.

केवळ बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यापुरताच समर्थ उपक्रम मर्यादित नसून या कारागिरांना नोंदणी प्रक्रियेपासून ते ऑनलाइन विक्री प्रक्रियेचा सराव होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मदत मिळण्याच्या दृष्टीने या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे. नोंदणी प्रक्रियेसाठी विशेष मदत, उत्पादनांची पद्धतशीर वर्गवारी, लेखे व्यवस्थापन, व्यवसायासंबंधी मार्गदर्शन, विक्रीसंदर्भात विशेष मदत, पात्र असेल त्या ठिकाणी कमी दलाली आणि गोदामांची मदत आदी लाभांचा या उपक्रमात समावेश करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील उद्योजकांपर्यंत मोठय़ा प्रमाणात पोहोचण्यासाठी फ्लिपकार्ट समर्थ नामवंत सेवाभावी संस्था, सरकारी संस्था आणि उपजीविका कार्यक्रमांची मदत घेणार असून महिलांचे नेतृत्व असलेले उद्योग, दिव्यांग उद्योजक, कारागीर आणि विणकरांवर या उपक्रमात विशेष भर दिला जाणार आहे. या घटकांना अनेकदा अपुरे खेळते भांडवल, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाचा अभाव आदी अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या समुदायांना भेडसावणाऱ्या नेमक्या समस्या आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा यांचा पद्धतशीर अभ्यास फ्लिपकार्टने केला असून या समस्यांची सोडवणूक करून या समुदायाला आपल्या उत्पादनांची नोंदणी व विक्री सहज पद्धतीने करता यावी, अशा प्रकारे फ्लिपकार्ट समर्थची रचना केली आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2019 4:09 am

Web Title: flipkart launches samarth initiative to empower weavers zws 70
Next Stories
1 पहिल्या तिमाहीत वित्तीय तूट ४.३२ लाख कोटींवर
2 पायाभूत आठ क्षेत्रांत वाढीचा दर शून्यावर
3 रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांचे निधन
Just Now!
X