कोणतीही संस्था चालविताना किंवा वैयक्तिक पातळीवर काम करताना नीती आणि नियमांचे पालन केले तर यश मिळविणे सोपे बनते, अशा शब्दांत ‘टाटा सन्स’चे माजी वित्त-संचालक इशात हुसेन यांनी यशाचे गमक उलगडले. ‘दि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंट्स इन इंग्लड अ‍ॅण्ड वेल्स’च्या दुसऱ्या वार्षिक पदवीदान समारंभाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
तीन दशकांमधील आपले कॉर्पोरेट क्षेत्रातील अनुभव त्यांनी यावेळी कथन केले. तसेच भावी सीए तयार करण्याऱ्या भारतीय शिक्षण संस्थांनी नवी प्रणाली वापरून प्रतिभावान आणि जागतिक पातळीवरील स्पर्धेला तोंड देऊ शकतील, असे सक्षम व्यावसायिक घडवावे, असा सल्ला त्यांनी दिला.
वित्तविषयक बाबी हाताळणाऱ्यांकडे कंपनीतील सर्वाधिक धोक्याच्या कामाचे व्यवस्थापन करावे लागते. तसेच, अकाऊंटट्सकडे उत्तम संवादकौशल्य असावे, त्याला चांगले सादरीकरण करता यावे आणि त्याच्याकडे आवश्यक कौशल्य असावे लागते, असा मुद्दा या चर्चेतून पुढे आला. व्यावसायिक दृष्टीकोन आवश्यक असतो आणि पारंपरिाक बुद्धीमत्ता म्हणून त्याला कमी लेखू नये, असे मतही या चर्चेतून मांडण्यात आले.
माहितीची विश्लेषण फार महत्त्वाचे असते. ज्यामुळे बदलाचे तंत्र कळते आणि नव्या कौशल्यांमधून बदल घडविता येतो, असा सल्लाही या चर्चेतून भावी सीएंना देण्यात आला.