News Flash

‘इकोस्पोर्ट’साठी फोर्डचा चेन्नईत नवीन प्रकल्प

स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल श्रेणीत दमदार पाय रोवून उभ्या ‘इकोस्पोर्ट’ला वाढत्या पसंतीने उत्साहित झालेल्या फोर्ड इंडियाने खास या वाहनासाठी चेन्नई येथील नवा प्रकल्प उभारला आहे. विविध

| June 19, 2013 12:03 pm

स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल श्रेणीत दमदार पाय रोवून उभ्या ‘इकोस्पोर्ट’ला वाढत्या पसंतीने उत्साहित झालेल्या फोर्ड इंडियाने खास या वाहनासाठी चेन्नई येथील नवा प्रकल्प उभारला आहे. विविध १० इकोस्पोर्ट मॉडेल्सचे उत्पादन येथून घेण्याचा निर्णय घेतानाच, हे वाहन चीनसह थेट युरोपातही निर्यात करण्याचा कंपनीचे नियोजन आहे.
फोर्ड इंडियाने चेन्नई येथील हा प्रकल्प गेल्या २१ महिन्यांनंतरच्या अथक प्रयत्नानंतर साकारला आहे. यासाठी १४.२ कोटी डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलन म्युलाले यांनी सोमवारी प्रकल्पस्थळी दिली. ही वाहने फोर्डच्या वितरकांकडेही रवाना करण्यात आली असून तिचे औपचारिक सादरीकरण समारंभपूर्वक चालू महिन्याअखेपर्यंत करण्यात येणार असल्याचे समजते.
मूळची अमेरिकेतील फोर्ड कंपनी जगभरातील पाच विविध प्रकल्पांतून या महत्त्वाकांक्षी वाहनाचे उत्पादन घेते. पैकी चेन्नईतील कंपनीचा तिसरा प्रकल्प आहे. कंपनी लवकरच थायलंड, रशिया येथेही उत्पादन निर्मिती सुरू करणार आहे. फोर्ड कंपनीने हे वाहन नवी दिल्ली येथे वर्षभरापूर्वी झालेल्या वाहन प्रदर्शनात सादर केले होते. प्रत्यक्षात आता हे वाहन लवकरच भारतातील रस्त्यांवर धावायला सुरुवात होईल.
संथ अर्थव्यवस्थेपोटी एकेकाळी चालकांचे लोकप्रिय ठरलेल्या स्पोर्ट युटिलिटी वाहन (एसयूव्ही) श्रेणीने पुन्हा एकदा वाहन विक्रीबाबत उत्पादकांची निराशा केली आहे. या श्रेणीत मातब्बर असलेल्या महिंद्र अॅन्ड महिंद्रलाही गेल्या काही कालावधीत फटका बसला आहे. असे असतानाच स्वस्तातील नव्या डस्टरद्वारे रेनो कंपनीला चांगला प्रतिसाद मिळत असून फोर्ड तिचे या श्रेणीतील अस्तित्व राखण्याच्या दृष्टीने झटत आहे. कंपनीची एन्डेव्हर ही महागडी एसयूव्ही सध्या यात आहे.
गेल्या वर्षांत एसयूव्हींची विक्री ६,१४० नोंदली गेली असून २०१५ पर्यंत ती १,२६,००० पर्यंत जाण्याचा आयएचएसचा अंदाज आहे. तिच्याच म्हणण्यानुसार गेल्या सात वर्षांमध्ये या श्रेणीतील वाहनांची विक्री वाढ जागतिक स्तरावर १५४ टक्क्यांनी झाली आहे. त्यातही मध्यम आकाराच्या स्वस्तातील वाहनांची वाढ ५६ टक्क्यांनी अधिक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 12:03 pm

Web Title: ford new project for export at chennai
टॅग : Business News
Next Stories
1 व्यापार वृत्त : कर तगाद्याचे नवे सावज ‘मेकमायट्रिप’!
2 रिझव्‍‌र्ह बँकेचा अपेक्षित सावध पवित्रा!
3 व्यापार तूटीचा विक्रमी कडेलोट!
Just Now!
X