विदेशी चलन विनिमयातून मिळकतीत १४.४ टक्के वाढ

निश्चलनीकरणातही देशातील विदेशी पर्यटकांचा ओघ वाढता राहिला आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये ८.९१ लाख विदेशी पर्यटकांनी भारताला भेट दिली आहे. नोव्हेंबर २०१४ मधील ७.६५ लाख विदेशी पर्यटकांच्या तुलनेत गेल्या महिन्यात ८.१६ लाख विदेशी पर्यटक भारतात आले आहेत. वार्षिक तुलनेत ही वाढ ९.३ टक्के आहे.

नोव्हेंबरच्या दुसऱ्याच आठवडय़ात निश्चलनीकरणाची घोषणा करण्यात आली होती. यानंतर विदेशी पर्यटकांवरही जुन्या नोटांबाबत र्निबध लादण्यात आले होते. पर्यटनाच्या माध्यमातून नोव्हेंबरमध्ये १४,४७४ कोटी रुपयांचे विदेशी चलन मिळकत झाली आहे. नोव्हेंबर २०१४ मधील १२,६४९ कोटी रुपयांच्या तुलनेत विदेशी चलन मिळकतीतील ही वाढ १४.४ टक्के आहे.

[jwplayer 9GaeB8Kn]

भारतात अमेरिका, ब्रिटन, बांगलादेश येथून येणाऱ्यांचे प्रमाण नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक नोंदले गेले आहे. पैकी अमेरिकेतून १५.५३ टक्के पर्यटक आले आहेत. ब्रिटनमधून येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण ११.२१ टक्के आहे.

सर्वाधिक विदेशी पर्यटक (३२.७१ टक्के) दिल्ली विमानतळावर उतरले आहेत. तर १८.५१ टक्क्यांसह मुंबई विमानतळावर येणाऱ्या विदेशी पर्यटकांचे प्रमाण दुसऱ्या स्थानावर आहे.

जानेवारी ते नोव्हेंबर २०१६ दरम्यान आलेल्या विदेशी पर्यटकांची संख्या ७८.५३ लाख होती. यात वर्षभरात १०.४ टक्के वाढ झाली आहे. तर या कालावधीतील विदेशी चलनातील मिळकत वर्षभरापूर्वीच्या १,२१,०४१ कोटी रुपयांवरून १४.७ टक्क्यांनी वाढून यंदा ती १,३८,८४५ कोटी झाली आहे.

[jwplayer 8iCPR0AZ]