आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या चलनांमध्ये होत असलेल्या अवमूल्यनाचा मुद्दा जी-२० बैठकीत उपस्थित करण्याचे सूतोवाच तुर्कस्तानच्या दौऱ्यावर निघालेल्या भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी केले.

दोन दिवसांच्या या बैठकीत भारताकडून अर्थमंत्री अरुण जेटली व रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन हे प्रतिनिधित्व करणार आहेत. थेट चीनचा उल्लेख न करता चलन अवमूल्यनामुळे आशियातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये स्पर्धात्मक अवमूल्यनाच्या चढाओढ सुरू होण्याचा धोका उभा ठाकला असल्याकडे जेटली यांनी निर्देश केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी थंडावली असताना स्पर्धात्मक चलन अवमूल्यनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेच्या प्रयत्नांना मारक ठरेल, असेही ते म्हणाले.