वैयक्तिक वाहतूकीसाठी भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मोबाइल अ‍ॅप ओलाने आज राजीव बन्सल यांची मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली.
राजीव यांच्याकडे अर्थविभागाचा २१ वर्षांचा अनुभव आहे त्यातील १६ वष्रे ते इन्फोसिसमध्ये मुख्य वित्तीय अधिकारी होते आणि सध्या मुख्य कार्यकारी अधिका-यांचे सल्लागार म्हणून त्यांची बदली झाली होती. राजीव हे ओलाच्या मुख्य नेतृत्व चमूचा भाग असतील आणि ते जानेवारी २०१६ मध्ये रुजू होणार आहेत. सध्याचे मुख्य वित्तीय अधिकारी मितेश शहा हे पुढे जाऊन राजीव यांच्या चमूचा एक भाग म्हणून धोरणात्मक वित्तीय उपक्रमांचे नेतृत्व करतील. ओलाचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल म्हणाले, ?राजीव यांचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. इन्फोसिस मधील प्रदीर्घ अनुभवाची संपत्ती त्यांच्याबरोबर आहे. विकासाच्या या टप्प्यावर राजीव यांची वित्तीय क्षेत्रातील समज आणि कौशल्य आमच्यासाठी अतिशय मौल्यवान आहे. भारतातील प्रतिष्ठित कंपनीच्या वित्तीय व्यवस्थेचे सुकाणू हाती असण्याचा त्यांचा अनुभव चांगली कार्यपध्दती स्वीकारण्यास आणि अब्जावधी लोकांची वाहतूक निर्माण करण्याचे आमचे ध्येय साध्य करण्यास साहाय्यकारी होईल.