पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट सुरु असूच शुक्रवारी मुंबईत पेट्रोल प्रति लिटर १५ पैसे तर डिझेल प्रति लिटर १६ पैशांनी स्वस्त झाले. मुंबईत शुक्रवारी पेट्रोल ८३. ५७ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७६.२२ रुपये प्रतिलिटर या दराने मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती कमी होत असून याचा फायदा भारतातील तेल कंपन्यांना होत आहे.शुक्रवारी मुंबईत पेट्रोल १५ पैसे आणि डिझेल १६ पैशांनी स्वस्त झाले. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर १५ पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत पेट्रोल ७८ रुपये ९६ पैसे तर डिझेल ७२. ७४ रुपये प्रतिलिटर या दराने मिळत आहे. मुंबईत १७ ऑक्टोबरपासून पेट्रोल प्रतिलिटर ४ रुपये ५७ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेल प्रतिलिटर २ रुपये ९७ पैशांनी स्वस्त झाले आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमधील दर
पुणे
पेट्रोल – ८३. ३९ रुपये
डिझेल – ७४. ८४ रुपये
नागपूर
पेट्रोल – ८४. ०५ रुपये
डिझेल – ७६. ७५ रुपये
औरंगाबाद
पेट्रोल – ८४.६७ रुपये
डिझेल – ७७. ३३ रुपये
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 9, 2018 8:45 am