मंगळवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. मंगळवारी मुंबईत पेट्रोलचे दर १० पैशांनी तर डिझेलचे दर ८ पैशांनी कमी झाले. मुंबईत पेट्रोल ८६. ८१ रुपये तर डिझेल ७८. ४६ रुपये प्रतिलिटर या दराने मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमती घटल्याने पेट्रोल व डिझेलच्या उत्पादनावरील खर्चातही घट झाल्याने पेट्रोलियम कंपन्या याचा लाभ ग्राहकांना देत आहेत. मंगळवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली. मंगळवारी दिल्ली आणि मुंबईत पेट्रोल १० पैसे तर डिझेल दिल्लीत सात पैसे आणि मुंबईत आठ पैशांनी स्वस्त झाले. आता दिल्लीत पेट्रोल ८१. ३४ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ७४. ८५ रुपये प्रतिलिटर या दराने मिळत आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवारपासून सातत्याने पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करण्यात येत आहे. गेल्या सहा दिवसात मुंबईत पेट्रोलचे दर १ रुपये ४९ पैशांनी तर डिझेलचे दर ८५ पैशांनी कमी झाले आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील दर (प्रतिलिटरनुसार)

पुणे
पेट्रोल – ८६. ६१ रुपये
डिझेल – ७७. ०२ रुपये

नागपूर
पेट्रोल – ८७. ३० रुपये
डिझेल -७८. ९९ रुपये

औरंगाबाद
पेट्रोल – ८७. ८६ रुपये
डिझेल – ७९. ५२ रुपये