X

अबकी बार महंगाई की मार! पेट्रोल, डिझेलच्या दराचा उच्चांक

मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८६. ७२ रुपयांपर्यंत पोहोचले असून डिझेलचे दर प्रति लिटर ७५. ७४ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

इंधन दरांची विक्रमी वाटचाल सुरुच असून मंगळवारी पेट्रोल प्रति लिटरमागे १६ पैशांनी तर डिझेल प्रति लिटरमागे २० पैशांनी महागले. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर ८६. ७२ रुपयांपर्यंत पोहोचले असून डिझेलचे दर प्रति लिटर ७५. ७४ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने याचा फटका थेट सर्वसामान्यांना बसणार आहे. पेट्रोल व डिझेल महागल्याने महागाई वाढण्याची शक्यता आहे.

प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली. मुंबईत पेट्रोलवर ३९.१२ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) घेतला जातो.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन याचा परिणाम भारतातील इंधन दरांवर होत आहे. मंगळवारी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली असून मुंबईत पेट्रोल १६ पैशांनी आणि डिझेल महागले आहे.

राज्यातील प्रमूख शहरांमधील दर

पुणे

पेट्रोल – ८६. ५२ रुपये

डिझेल – ७४. ३८ रुपये

नागपूर

पेट्रोल – ८७. २० रुपये

डिझेल – ७६. २६ रुपये

औरंगाबाद

पेट्रोल – ८७. ७६ रुपये

डिझेल – ७६. ७९ रुपये

First Published on: September 4, 2018 7:50 am
Outbrain

Show comments