पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरुच असून सोमवारी मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ३१ पैशांनी महागले आहे. तर डिझेल प्रति लिटरमागे ४४ पैशांनी महागले आहे. रुपयाची घसरगुंडी आणि कच्चा तेलाच्या दरात झालेली वाढ यामुळे देशात इंधनाचा भडका उडाला आहे. मात्र, इंधन दरवाढीमुळे महागाईत भर पडण्याची चिन्हे आहेत.

प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.

सोमवारी इंधनाच्या दराने मुंबईत विक्रमी पल्ला गाठला. मुंबईत एक लिटर पेट्रोलला ८६. ५६ रुपये तर डिझेलला ७५. ५४ रुपये मोजावे लागत आहे. गेल्या आठवड्याभरात ही चौथी इंधन दरवाढ आहे. मुंबईसह दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या  मोठ्या शहरांमध्येही पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

मुंबईत पेट्रोलवर सर्वात जास्त म्हणजे ३९.१२ टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) घेतला जातो. त्यामुळे मुंबईतील इंधनाचे दर अन्य शहरांपेक्षा जास्त आहेत. दिल्लीत पेट्रोलवर २७ टक्के आणि डिझेलवर १७.२४ टक्के व्हॅट घेतला जात असल्याने तेथील इंधनदर मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यापेक्षा कमी आहेत.

राज्यातील प्रमुख शहरांमधील दर (प्रति लिटरनुसार)
> पुणे<br />पेट्रोल – ८६. ३६ रुपये
डिझेल – ७४. १९ रुपये

> औरंगाबाद<br />पेट्रोल – ८७. ६१ रुपये
डिझेल – ७६. ५९ रुपये

> नागपूर<br />पेट्रोल – ८७. ०४ रुपये
डिझेल – ७६. ०६ रुपये