वाढलेला पुरवठा आणि आर्थिक मंदीपायी घटलेल्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किंमतीत घट झाल्याने भारतातील पेट्रोल व डिझेलच्या दरातही कपात सुरूच आहे. शनिवारी मुंबईत पेट्रोल व डिझेल प्रति लिटर १७ पैशांनी स्वस्त झाले आहे. शनिवारी मुंबईत पेट्रोल ८३. ४० रुपये आणि डिझेल ७६. ०५ रुपये प्रतिलिटर या दराने मिळत आहे.

अमेरिकेने प्रमुख तेल निर्यातदार इराणवर चालू आठवड्यापासून पूर्ण निर्बंध लागू केले असले तरी त्याचा एकूण तेल पुरवठ्यावर झालेला नाही. चालू वर्षांत एप्रिलनंतर प्रथमच तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनी प्रति पिंप ७० डॉलरच्या खालची पातळी दाखवली आहे. याचा फायदा भारतालाही होत असून तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात केली आहे. शनिवारी मुंबईत पेट्रोल व डिझेल १७ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर दिल्लीत पेट्रोल १७ आणि डिझेल प्रतिलिटर १६ पैशांनी स्वस्त झाले. शनिवारी दिल्लीत पेट्रोल ७७. ८९ रुपये तर डिझेल ७२. ५८ रुपये प्रतिलिटर या दराने मिळत आहे. मुंबईत १७ ऑक्टोबरपासून पेट्रोल प्रतिलिटर ४ रुपये ७४ पैशांनी स्वस्त झाले आहे. तर डिझेल प्रतिलिटर ३ रुपये १४ पैशांनी स्वस्त झाले आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील दर (प्रतिलिटरनुसार)

पुणे
पेट्रोल – ८३. २२ रुपये
डिझेल – ७४. ६८ रुपये

नागपूर
पेट्रोल – ८३. ८८ रुपये
डिझेल – ७६. ५८ रुपये

औरंगाबाद
पेट्रोल – ८४. ५० रुपये
डिझेल – ७७. १६ रुपये