News Flash

दोन वर्षांत ५० विक्री दालनांचे ‘स्पेसवूड’चे लक्ष्य

नागपूरस्थित देशातील दुसरी मोठी फर्निचर निर्माता कंपनी स्पेसवूड फर्निशर्स प्रा. लि.ने आगामी दोन वर्षांत देशव्यापी अस्तित्व फैलावण्याची उद्दिष्ट राखत एकूण ५० शोरूम्स थाटण्याचे नियोजन आखले

| August 19, 2015 03:49 am

नागपूरस्थित देशातील दुसरी मोठी फर्निचर निर्माता कंपनी स्पेसवूड फर्निशर्स प्रा. लि.ने आगामी दोन वर्षांत देशव्यापी अस्तित्व फैलावण्याची उद्दिष्ट राखत एकूण ५० शोरूम्स थाटण्याचे नियोजन आखले आहे. चालू आर्थिक वर्षअखेर कंपनीला एकूण उलाढाल सध्याच्या ३२५ कोटी रु. (मार्च २०१५ अखेर) ४२५ कोटी रुपयांवर जाणे अपेक्षित आहे.
सध्या स्पेसवूडची विक्री दालने चार बडय़ा महानगरांसह सात शहरांमध्ये अस्तित्वात असून, आगामी दोन वर्षांत महिन्याला एक याप्रमाणे विक्री दालने विस्तारत नेण्याचे नियोजन असल्याचे स्पेसवूडचे मुख्याधिकारी व संचालक किरीट जोशी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. मुंंबई-पुण्यात प्रत्येकी दोन नवीन दालने साकारली जाणार आहेत. जोशी आणि विवेक देशपांडे हे या कंपनीचे संस्थापक असून, नागपूर येथे १५ एकर क्षेत्रफळावर कंपनीचा उत्पादन प्रकल्प आणि मध्यवर्ती भांडारगृह कार्यरत आहे.
कंपनीने आगामी काही वर्षांत २५ टक्के वृद्धीदराने प्रगती साधली जाणे अपेक्षिले असून, सरकारच्या स्मार्ट सिटी आणि गृहनिर्माणाच्या योजनांना गती मिळाल्यास या वृद्धीदरात आणखी वाढ शक्य आहे, असे जोशी यांनी सांगितले. कंपनीने स्वमालकीच्या विक्री दालनांव्यतिरिक्त, स्नॅपडील, पेपरफ्राय, फॅबफर्निश यांसारख्या ई-व्यापार संकेतस्थळांवरूनही विक्री करते. रिलायन्स, अदानी, जेट एअरवेज, अ‍ॅक्सेन्च्युर, कॅपजेमिनी, क्योनी ट्रॅव्हल्स वगैरे कंपनीचे बडे ग्राहक आहेत. शिवाय, पेनिन्सुला, कोलते-पाटील डेव्हलपर्स, डीएसके, माव्‍‌र्हल वगैरे बांधकाम व्यावसायिकांकडून कंपनीच्या मॉडय़ूलर किचन्सना एकगठ्ठा मागणी मिळत असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 3:49 am

Web Title: furniture company spacewood open 50 outlet in next two year
Next Stories
1 रुपया दोन वर्षांच्या तळात
2 बिगर मोसमी पावसाचा कृषी क्षेत्राला फटका
3 इन्स्टाग्राम पोस्ट्सद्वारे जाहिरातबाजीची केलॉग्जकडून सुरूवात
Just Now!
X