01 October 2020

News Flash

रिलायन्स जगात भारी… जागतिक क्रमावरीत दुसऱ्या स्थानी घेतली झेप

अ‍ॅपल पहिल्या क्रमांकावर कायम

संग्रहित छायाचित्र

अ‍ॅपल हा जगातील पहिल्या क्रमांकाचा ब्रॅड आहे. परंतु आता ऑईल क्षेत्रापासून ते टेलिकॉम क्षेत्रात सर्वच ठिकाणी यशाची शिखरं गाठणाऱ्या मुकेश अंबानी यांचा रिलायन्स हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रॅन्ड ठरला आहे. फ्युचर ब्रॅन्ड इंडेक्स २०२० मध्ये अॅपलनंतर दुसऱ्या क्रमांकावर रिलायन्सनं झेप घेतली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज रिफायनरी, रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रातील प्रमुख कंपनी आहे. रिलायन्सनं दुसऱ्या क्रमांकासाठी सर्वात मोठी झेप घेतली आहे. तसंच प्रत्येक ठिकाणी रिलायन्सनं आपल्याला सिद्ध केलं असल्याचं फ्युचब्रॅन्ड इंडेक्स २०२० ची यादी जाहीर करताना सांगण्यात आलं. रिलायन्स ही कंपनी भारतात सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. तसंच कंपनीबाबत सर्वांमध्ये चांगली भावना आहे आणि कंपनीदेखील नैतिकदृष्ट्या काम करते. नाविन्यपूर्ण उत्पादनं, उत्तम ग्राहक अनुभव आणि वृद्धी यासोबत कंपनी जोडली गेली असून कंपनीचे सर्वांसोबतच भावनिक संबंध आहेत, असंही यावेळी नमूद करण्यात आलं.

कोणते आहेत टॉप १० ब्रॅन्ड ?

अ‍ॅपल

रिलायन्स

सॅमसंग

एनविडिया

मोताई

नायकी

मायक्रोसॉफ्ट

एएसएमएल

पेपाल

नेटफ्लिक्स

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 3:33 pm

Web Title: future brand index mukesh ambani reliance step to second place after apple jud 87
Next Stories
1 एप्रिलच्या तुलनेत अर्थव्यवस्था सुधारण्यास सुरूवात : शक्तिकांत दास
2 व्याजदर कपात की कर्जहप्ते सवलतवाढ?
3 वाहन कंपन्या सज्ज, सणजोडीला नवीन उत्पादने
Just Now!
X