News Flash

मोटर विमा दाव्याच्या सव्रेक्षणासाठी ‘फ्यूचर जनराली’चा डिजिटल प्रघात

ज्यायोगे दाव्यांचे निवारण ५० टक्के कमी वेळात आणि अचुकतेने होणे कंपनीला अपेक्षित आहे.

खासगी क्षेत्रातील सामान्य विमा कंपनी फ्युचर जनराली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आपल्या मोटर दावे तपासणाऱ्या ‘आय-मॉस’ अ‍ॅपचा वापर सुरू करीत असल्याची घोषणा केली. मोटर दावे तपासनीसांकडून वापरात येणाऱ्या या अ‍ॅपच्या मदतीने ७० टक्के मोटर विमा दाव्यांचा निष्कर्ष तत्क्षणी विनाविलंब काढता येईल.

ज्यायोगे दाव्यांचे निवारण ५० टक्के कमी वेळात आणि अचुकतेने होणे कंपनीला अपेक्षित आहे.

ग्राहकांना अधिक चांगली सेवा देता यावी यासाठी नवनवीन तांत्रिक उपक्रम राबवण्यात अग्रस्थानी राहण्याचा फ्युचर जनरालीचा नेहमीच प्रयत्न असतो. हे अ‍ॅपच पडलेले पाऊल त्याचेच प्रत्यंतर आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी के जी कृष्णमूर्ती यांनी सांगितले.

दाव्याची सूचना मिळणे सोपे झाल्याने आणि जलद तोडगा प्रक्रियेमुळे या क्षेत्रात नवीन मापदंड स्थापला जाईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 5:46 am

Web Title: future generali india insurance company limited motor insurance
Next Stories
1 अपेक्षेप्रमाणे रेपोदरात कपात, गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता
2 आज व्याजदर कपात अटळ
3 टाटा समूहाला सरकारी साहाय्य
Just Now!
X