25 February 2021

News Flash

फ्युचर – रिलायन्स व्यवहाराला स्थगिती

अ‍ॅमेझॉनच्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

(संग्रहित छायाचित्र)

फ्युचर रिटेल व रिलायन्स रिटेल दरम्यानच्या व्यवहाराला स्थगिती देतानाच याबाबतचे स्पर्धक अमेरिकी अ‍ॅमेझॉनचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एकून घेतले. राष्ट्रीय कंपनी निधी न्यायाधिकरणासमोर हा तिढा सोडविण्याचे सूचवितानाच न्यायालयाने फ्युचर समूहाकडून याबाबत नोटीस पाठवून बाजू मांडण्यास सांगितले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने फ्युचर रिटेल लिमिटेड व रिलायन्स यांच्यातील व्यवहारात ‘जैसे थे’चे आदेश दिल्यानंतर अ‍ॅमेझॉनने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. यावर फ्युचर रिटेल व प्रवर्तक किशोर बियाणी यांच्यासह इतरांना नोटीस जारी करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरूच राहील; मात्र त्यातून फ्युचर व रिलायन्स यांच्या एकात्मीकरणाचा अंतिम निर्णय दिला जाणार नाही. न्या. आर. एफ. नरिमन, न्या. बी. आर. गवई यांनी फ्युचर व समूहाचे अध्यक्ष किशोर बियानी व अन्य यांना नोटस जारी केली असून त्यावर उत्तर मागवले आहे. संबंधितांना तीन आठवडय़ात उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. पाच आठवडय़ांनी त्यावर सुनावणी होईल, असे न्यायालयाने जाहीर केले.

दिल्ली उच्च न्यायालयाने ८ फेब्रुवारीला दिलेल्या आदेशात फ्युचर व विविध वैधानिक अधिकाऱ्यांना रिलायन्स रिटेल बरोबरच्या २४,७१३ कोटींच्या व्यवहारात ‘जैसे थे’ स्थितीत ठेवण्याचा आदेश जारी केला होता. फ्युचरने दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर २ फेब्रुवारीला निकाल देण्यात आला होता. त्या निकालावर दिल्ली उच्च न्यायालयाने उपरोक्त आदेश दिला होता. उच्च न्यायालयाच्या न्यायपीठाने अ‍ॅमेझॉनला इतर मार्ग अवलंबण्यासाठी अवधी देण्यास नकार दिला होता. सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय लवादाने २५ ऑक्टोबर २०२०ला फ्युचर रिटेलला रिलायन्स रिटेलबरोबर २४,७१३ कोटींचा व्यवहार करण्यास मनाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 12:15 am

Web Title: future suspension of reliance transactions abn 97
Next Stories
1 गुंतवणूकदारांमध्ये धास्ती; प्रमुख निर्देशांकांत आपटी!
2 RBI ने ‘या’ बँकेवर घातले निर्बंध; ग्राहकांना एक हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे काढता येणार नाहीत
3 सोने विक्रमी मूल्यापासून १० हजाराने दूर
Just Now!
X