जी.पी. अर्थात गोपीनाथ पारसिक नागरी सहकारी बँकेला २०१३ चा बँको पुरस्कार मिळाला आहे. १,१०१ ते १,७५० कोटी ठेव असणाऱ्या सहकारी बँकेच्या गटात मिळालेला हा पुरस्कार सहकार खात्याचे अप्पर आयुक्त दिनेश ओवोळकर यांच्या हस्ते बँकेचे अध्यक्ष रणजीत पाटील आणि इतर संचालकांनी स्वीकारला. नागरी बँक विभागाचे निबंधक धनंजय डोईफोडे, बँकोचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे आदी याप्रसंगी उपस्थित होते.