01 June 2020

News Flash

धन धनाधन… रिलायन्स जिओमध्ये साडेसहा हजार कोटींची परदेशी गुंतवणूक

रिलायन्स जिओमध्ये ४ आठवड्यात ४ कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.

रिलायन्स जिओमध्ये न्यूयॉर्कमधील खासगी इक्विटी कंपनी जनरल अटलांटिकनं ६,५९८.३८ कोटी रूपयांची गुंतवणूक केल्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत जनरल अटलांटिक जिओ प्लॅटफॉर्ममधील १.३४ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. आशियाई कंपनीतील जनरल अटलांटिकची ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. रविवारी कंपनीनं यासंदर्भातील माहिती दिली.

गेल्या चार आठवड्यांमध्ये रिलायन्स जिओमध्ये चार मोठ्या गुंतवणुकदारांनी गुंतवणूक केली आहे. याद्वारे रिलायन्स जिओमध्ये चार आठवड्यात ६७,१९४.७५ कोटी रूपयांची गुंतवणूक झाली आहे. सर्वप्रथम फेसबुकनं रिलायन्स जिओमध्ये फेसबुकनं ४३ हजार ५७४ कोटी रूपयांची गुंतवणूक करत ९.९९ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती.

फेसबुकच्या गुंतवणुकीनंतर टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्व्हरलेकनं ५,६६५.७५ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह जिओमधील १.१५ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर विस्टा इक्विटी पार्टनर्सनं जिओमधील २.३२ टक्के हिस्सा खरेदी केला होता. याअंतर्गत त्यांनी कंपनीत ११,३६७ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती.

रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्मचं इक्विटी मूल्य ४.९१ लाख कोटी रूपये आणि एन्टरप्राईझेस व्हॅल्यू ५.१६ लाख कोटी रूपये झाली असल्याची माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजकडून देण्यात आली. आतापर्यंत या चार गुंतवणुकीतून कंपनीचा १४.८ टक्के हिस्सा विकण्यात आला आहे. “ग्लोबल इंडिस्ट्रिजचं व्हॅल्यू पार्टनर म्हणून मी स्वागत करतो. जनरल अटलांटिकला भारतावर विश्वास आहे. तसंच आमच्या डिजिटल व्हिजनशीदेखील त्यांचा विश्वास आहे. यासाठी त्यांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुतवणूक केली आहे,” अशी माहिती रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिली. ही गुंतवणूक म्हणजे रिलायन्सचा कर्जमुक्तीच्या दिशेने सुरू असलेला प्रवास असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2020 11:27 am

Web Title: general atlantic invested 6500 crore rupees in jio platform fourth investment in 4 weeks jud 87
Next Stories
1 परदेशी गुंतवणूकदारांसाठी जमीन राखीव
2 जागतिक अर्थव्यवस्थेला ८.८ लाख कोटी डॉलरचा फटका
3 मुंबई – पुणेकेंद्री नव्हे तर विकेंद्रित विकास व्हावा
Just Now!
X