मुंबई : जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस पंजाब नॅशनल बँकेबरोबर (पीएनबी) तिच्या ग्राहकांना ‘थ्री-इन-वन’ खात्याचा लाभ देण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.

या सेवेअंतर्गत, पीएनबीचे बचत खाते, पीएनबीचे डिमॅट खाते आणि जिओजितचे ट्रेडिंग खाते असे गुंतवणूकदृष्ट्या सोयीस्कर तिहेरी खाते ग्राहक उघडले जाऊ शकेल.

पीएनबीमध्ये बचत आणि डिमॅट खाते विनासायास आणि ऑनलाइन पद्धतीने उघडता येते. तर कोणत्याही कागदपत्रांविना केवळ १५ मिनिटांत ऑनलाइन उघडता येणारे ट्रेडिंग खाते सुविधा जिओजितर्फे देण्यात आली आहे, शिवाय विविध गुंतवणुकीच्या पर्यायात ऑनलाइन पद्धतीने गुंतवणूक करण्याची सुविधा व सक्षमता ग्राहकांना प्रदान केली जाते.

जिओजितने अशाच प्रकारचे सामंजस्य हे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी), जी आता युनियन बँकेसह पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) विलीन झाली आहे.