Glenmark Pjarmaceuticals ची उपकंपनी असलेल्या Glenmark Life Sciences Limited ने २७ जुलै म्हणजेच आजपासून आपले आयपीओ खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले. पहिल्याच दिवशी ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या आयपीओला अर्थात प्रारंभिक समभाग विक्रीला तुफान प्रतिसाद मिळाला असून तब्बल ७९ टक्के IPO खरेदी देखील झाल्याची माहिती समोर येत आहे. २६ जुलै रोजी कंपनीने आपल्या अँकर गुंतवणूकदारांकडून तब्बल ४५४ कोटी रुपयांचं भांडवल उभं केलं आहे. त्यामुळे समभागांची संख्या कमी करून १.५ कोटी रुपयांचे समभाग कंपनीने उपलब्ध करून दिले होते. मात्र, त्यात कंपनीकडे १.८ कोटी रुपयांच्या समभागांसाठी बोली लागली आहे. येत्या २९ जुलैपर्यंत ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेडचे आयपीओ खरेदी करता येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Glenmark IPO चा Price Brand किती आहे?

ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस लिमिटेडनं आयपीओमधून तब्बल १ हजा ५१५ कोटींचं भांडवल उभारण्याचं नियोजन केलं आहे. त्याव्यतिरिक्त १ हजार ६० कोटी फ्रेश इक्विटी शेअर्स आणि ६३ लाख इक्विटी शेअर्सवरच्या ऑफर फॉर सेल्समधून उभारण्याचं कंपनीचं नियोजन आहे. यासाठीचा Price Brand अर्थात किंमतीचा टप्पा ६९५ रुपये ते ७२० रुपये प्रति शेअर असा निश्चित करण्यात आला आहे. खरेदीसाठी किमान लॉट साईज २० शेअर्सची निश्चित करण्यात आली असून त्यापुढे देखील २० च्या पटीमध्येच तुम्हाला शेअर्स खरेदी करता येणार आहेत.

ICICI Direct ची कौतुकाची पावती!

“ग्लेनमार्क कंपनी ही अग्रगण्य विकसक आणि उत्पादक असून उच्च नीतिमूल्य असलेली आहे”, असं ICICI Direct नं म्हटलं आहे. याशिवाय, ग्लेनमार्क जगभरातल्या १६ मोठमोठ्या कंपन्यांसोबत काम करते. जागतिक स्तरावर एपीआय व्यवसाय वाढत जाण्याचा कल दिसून येत असल्याचं देखील आयसीआयसीआय डायरेक्टनं नमूद केलं आहे.

भांडवली बाजारातील तेजीमागील अदृश्य हात

ग्लेनमार्ग लाईफ सायन्सेस लिमिटेड ही कंपनी या आयपीओंसोबतच गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिसॉर्डर, अँटि इन्फेक्टिव्ह आणि इतर उपचारांच्या क्षेत्रातील API ची देखील विक्री करते. ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात Glenmark Life Sciences Limited कंपनीचं वार्षिक उत्पन्न १ हजार ५३७ कोटी तर निव्वळ नफा ३१४ कोटी इतका होता.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Glenmark life sciences ipo opens on july 27 check price band shares received high bidding pmw
First published on: 27-07-2021 at 13:07 IST