04 March 2021

News Flash

जागतिक बाजारात मात्र उसळी

तेल उत्पादन कपातीच्या ‘ओपेक’ निर्णयाचे स्वागत

तेल उत्पादन कपातीच्या ओपेकनिर्णयाचे स्वागत

घसरणाऱ्या खनिज तेल दरांमुळे उत्पादनाला आळा घालण्याच्या प्रमुख तेल उत्पादक देशांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाला जागतिक भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी मात्र सहर्ष सहमती दिली. अमेरिकेतील वॉल स्ट्रीटसह आशिया आणि युरोपातील प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी उसळी नोंदली गेली.

प्रमुख तेल उत्पादक देशांची बैठक बुधवारी उशिरा झाली. या बैठकीत आधीच अतिरिक्त असलेल्या इंधन पुरवठय़ाला यापुढे आळा घालण्याचा निर्णय घेण्यात आला. थोडक्यात, इंधनाचे अधिक उत्पादन घेण्याबाबत तूर्त ‘जैसे थे’ भूमिका घेण्यात आली.

याचा परिणाम जागतिक बाजारात प्रामुख्याने तेल क्षेत्राशी निगडित सूचिबद्ध कंपन्यांचे समभागमूल्य उसळले. ऊर्जा क्षेत्रातील समभागांनाही मागणी राहिली. लंडनच्या एफटीएसई१०० मंचावर रॉयल डच शेल आणि बीपी या तेल कंपन्यांचे मूल्य अनुक्रमे ४ व ५.३ टक्क्यांनी उंचावले होते. तर दुपापर्यंत हा प्रमुख निर्देशांकही एक टक्क्यांसह तेजीत होता. त्याचबरोबर पॅरिसचा कॅक ४०, फ्रँकफर्टचा डॅक्स ३० हेदेखील बुधवारच्या तुलनेत एक टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवीत होते.

युरोपातील बाजारांची ही स्थिती असतानाच आशियातील निक्केई (जपान), हँग सेंग (हाँग काँग), शांघाय कंपोझिट (शांघाय) हे निर्देशांक १.४० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदविणारे ठरले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 3:00 am

Web Title: global stock market trading
Next Stories
1 ‘लोकसत्ता अर्थसल्ला गुंतवणुकीचा योग्य मार्ग दाखविणार!
2 पतधोरणापूर्वी प्रथेप्रमाणे गव्हर्नर – अर्थमंत्र्यांची भेट!
3 आयसीआयसीआय प्रुडेन्शियलची मुहूर्तदिनीच ११ टक्के घसरण
Just Now!
X