गेल्या १०६ वर्षांत जगभरात बनविण्यात येणाऱ्या जीएम (जनरल मोटर्स) नाममुद्रेच्या वाहनांनी ५० कोटींचा टप्पा गाठला आहे. वाहननिर्मिती करणाऱ्या इतर कोणत्याही कंपनीपेक्षा ही संख्या सर्वाधिक असल्याचा दावा यानिमित्ताने करण्यात आला आहे. 

हा अनोखा टप्पा गाठल्याचा आनंद कंपनीने नुकताच आपल्या निवडक ग्राहकांबरोबर साजरा केला. कंपनीने नेहमीच आपल्या ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवल्याचे यावेळी िबबविण्यात आले.
जीएमकडे असलेल्या निर्मितीक्षमतेसाठी आम्ही हा आनंद साजरा करत नाही, तर आमच्या ग्राहकांचा शेव्हल्रे आणि जीएमच्या इतर नाममुद्रेप्रती असलेला अनुभव याचा हा उत्सव आहे, असे कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाचे अध्यक्ष स्टेफान जॅकोबी यांनी यावेळी सांगितले.
जॅकोबी म्हणाले, आम्ही ५० कोटी वाहने तयार करू शकलो याचा आम्हाला अभिमान आहेच; मात्र आम्हाला आणखी ५० कोटी वाहने तयार करायची असतील तर त्यासाठी ग्राहक हाच केंद्रिबदू ठेवावा लागेल, याची आम्हाला जाणीव आहे.
हा टप्पा गाठल्याबद्दल अमेरिकेत झालेल्या एका कार्यक्रमात ‘जीएम’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी बार्रा यांनी ग्राहकांच्या आयुष्यात दैनंदिन प्रवासापासून कौटुंबिक सहलींपर्यंत आणि लग्नसमारंभांपासून पदवीग्रहण सोहळ्यासारख्या प्रसंगांपर्यंत जीएमच्या वाहनांनी काय भूमिका निभावल्याचे कथन केले.
२०१५ मध्ये आम्ही दिवसाच्या २४ तासांत दर तासाला १,००० हून अधिक नवीन वाहने विकू, अशी अपेक्षा आहे, असे बार्रा यांनी यावेळी सांगितले.
त्या म्हणाल्या, या सगळ्याची बेरीज वर्षांला एक कोटी होते. ती आमच्या आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक आहे. आम्ही एक कंपनी या क्षेत्रात अग्रेसर आहोत, हे सिद्ध करण्याच्या एक कोटी संधी या दृष्टीने मी याकडे पाहते आणि ग्राहकांचे आभार मानते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. मुळच्या अमेरिकेच्या जीम कंपनीची अनेक वाहने भारतातही आहेत.