शेअर बाजार, चलन बाजारात रुपया तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेल असे सारे घसरणीच्या दरीत लोटले जात असताना मुंबईच्या सराफ बाजारात बुधवारी सोने-चांदी भावाची नेत्रदीपक चमक दिसली. स्टॅण्डर्ड सोने धातूचा भाव तोळ्यामागे थेट ३०५ रुपयांनी वाढून २६ हजारांपुढे, २६,२९५ रुपयांपर्यंत गेले. शुद्ध प्रकारचे सोनेही १० ग्रॅमसाठी याच प्रमाणात वाढल्याने २६,५०० रुपयांनजीक, २६,४४५ रुपयांवर स्थिरावले. चांदीच्या दरातही एकाच व्यवहारात थेट २८० रुपयांनी वाढ झाल्याने पांढरा धातू किलोकरिता ३४,७१५ रुपयांपर्यंत जाऊन भिडले.