News Flash

सोन्याच्या किंमतीला झळाळी; चांदीही चमकली

पाहा किती झाले सोन्याचांदीचे दर

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीचे दर सतत वाढताना दिसत आहेत. सोन्याच्या दरानं तर सध्या उच्चांकच गाठल्याचं पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात शुक्रवारी सोनाच्या किंमतीत ६८७ रूपयांची वाढ होऊन सोन्याचा दर ५४ हजार ५३८ रूपये प्रति १० ग्राम वर पोहोचला. एचडीएफसी सिक्योरिटीजनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. यापूर्वी गुरूवारी कामगाजाच्या अखेरिस सोन्याचा दर ५३ हजार ८५१ रूपये प्रति १० ग्रामवर पोहोचला होता. तर दुसरीकडे शुक्रवारी चांदीच्या किंमतीतही मोठी वाढ पाहायला मिळाली. चांदीच्या किंमतीत २ हजार ८५४ रूपयांची वाढ होऊन ती ६५ हजार ९१० रुपये प्रति किलोवर पोहोचली. गुरूवारी चांदीचा दर ६३ हजार ०५६ रूपये प्रति किलो इतके होते. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचांदीच्या दरात वाढ होत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यानंतर दिल्लीतील २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीत ६८७ रूपयांची वाढ झाली, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिली. तर दुसरीकडे शुक्रवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकातही घसरण पाहायला मिळाली. तर अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयची चार पैशांनी घसरण होऊन एका डॉलरची किंमत ७४.८४ रुपयांवर (प्राथमिक आकडेवारी) बंद झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर वाढीसह १ हजार ९७६ डॉलर्स प्रति औंस आणि चांदीचा गर २४ डॉलर्स प्रति औंसवर पोहोचला आहे. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तर आर्थिक वृद्धी दरही कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सोन्याचांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत असल्याचं पटेल म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 11:13 am

Web Title: gold and silver price hike crossed mark of 54000 rupees international market affect know what are new rates jud 87
Next Stories
1 घसरते व्याजदरही तूर्त पसंतीचे!
2 बाजार-साप्ताहिकी : एक पाऊल मागे
3 मुखपट्टय़ांच्या १२ हजार कोटींच्या बाजारपेठेवर ‘व्हीआयपी’ची नजर
Just Now!
X