13 December 2017

News Flash

सोने : गुंतवणूक कप्प्यातील आवश्यक घटक!

बहुसंख्य वर्गात आजही सोन्याला प्राधान्य देण्यात येते.

हर्षल बारोट | Updated: October 10, 2017 3:10 AM

आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्याचा भाव मध्यम कालावधीसाठी प्रति औन्स १,३८० ते १,४०० डॉलर दरम्यान राहील. तर स्थानिक बाजारात सोन्याचा तोळ्यासाठी २८,००० ते २८,२०० भाव राहिल्यास तो ३०,५०० ते ३०,८०० रुपयेपर्यंत जाईल.

भारतात, पूर्वीपासून सोन्याकडे गुंतवणूक पर्यायापेक्षा बचतीचे साधन म्हणून पाहिले जाते. कारण या धातूला तशी भक्कम परंपरा लाभलेली आहे. सोन्याची खरेदी ही विवाहप्रसंगी दागिने घडविण्याच्या दृष्टीने करण्यात येते. अलीकडच्या काळात वित्तीय समावेशाने पुन्हा उचल खाल्ली आणि बचतीचा कल इतर वित्तीय मालमत्तांकडे एकवटला.

तरीही बहुसंख्य वर्गात आजही सोन्याला प्राधान्य देण्यात येते. सध्या सणांची धूम असल्याने सोने खरेदीला पुन्हा एकदा उधाण आले आहे. दसऱ्याला सोने खरेदीचे विशेष महत्त्व आहे.

भारतात आजही गुंतवणूक मालमत्ता म्हणून सोन्याला विशेष पसंती असल्याचा विश्वास आम्हाला वाटतो. अर्थात, या पर्यायात रोख्यांवरील व्याज किंवा ‘इक्विटीवर डिव्हीडंट’ मिळत नाही. मात्र जागतिक जोखीम किंवा चलन बाजार अस्थिरतेच्या काळात सोन्याचा विमा कवचाप्रमाणे उपयोग नक्कीच होतो.

सोन्याची आवड कशासाठी?

यावर्षी बऱ्याच अंशी अस्थिरता दिसली. जागतिक गुंतवणूकदार आत्मसंतुष्ट राहिला. अमेरिकेत सीबीओई व्हीआयएक्सने ऐतिहासिक घसरण अनुभवली. अमेरिकन समभाग निर्देशांक काही प्रसंग वगळता पडलेलाच राहिला. यामधील एक वास्तव म्हणजे जागतिक स्तरावर वृद्धीजन्य वातावरण निर्माण झाले आहे. ज्यामुळे गुंतवणुकदारांना नकारात्मक धोक्याचा अंदाज कमी करणे शक्य झाले. मागील वर्षी ट्रम्प विजय, ब्रेक्झिट मतदान आणि उत्तर कोरियामुळे उद्भवलेली राजकीय भीती अशा काही मुख्य धक्कय़ातही जागतिक वित्तीय बाजारपेठांनी आश्र्च्र्यकारक लवचीकपणा अनुभवला.

दुसरी गोष्ट म्हणजे, आर्थिक परिस्थिती जागतिक स्तरावर अनुकूल राहिल्याने गुंतवणुकदारात दहशतीचे वातावरण नव्हते. तरीही जर नकद धोरणे सामान्य होऊ  लागली. मध्यवर्ती बँकेचे आर्थिक ताळेबंद विश्रांती घेतील. आर्थिक परिस्थिती त्वरीत संकुचित होऊ  शकते व अस्थिरता अनपेक्षितपणे वाढीस लागेल.

राजकीय जोखीम ठरते लक्षणीय

अमेरिका आणि उत्तर कोरिया दरम्यान मतभेद ताणले जात असताना जागतिक स्तरावर अस्थिरता उद्भवल्यास काय परिणाम होतील याचे संकेत जागतिक बाजारपेठेवर दिसत असतात. बऱ्याच ठिकाणी हा प्रतिसाद मर्यादित स्वरूपाचा असतो. अशी राजकीय जोखीम स्थिती उद्भवल्यास सोन्यासारखे ऐवज फायद्याचे ठरतात. राजकीय मतभेदांची व्याप्ती केवळ उत्तर कोरियापुरती राहणारी नाही.

यावर्षी अमेरिकेने रशिया आणि इराणवर नवीन संमती लादल्यामुळे वातावरण तापले आहे. अर्थात टोकाचा राजकीय भूकंप येईल आणि गुंतवणूकदारांना अनपेक्षित राजकीय तणाव प्रसंगात सोन्याचा आधार घ्यावा लागेल अशी शक्यता वाटत नाही.

चलनवाढीचे अजूनही सावट

अमेरिका, युरो क्षेत्र आणि जपानसारख्या मुख्य देशांच्या अर्थकारणात चलन फुगवटय़ाचे आव्हान आहे. महागाई भडकल्याने पैसा वाया जातो. चलन फुगवटय़ाची रचना बदलली आहे. त्यातच तेलाच्या कमी किमतींमुळे भारत व जगावरील चलनवाढीचा दबाव अधिकच मंदावला. याचा अर्थ वर्षांच्या सुरुवातीला असणाऱ्या भीतीच्या तुलनेत फेड आणि इतर मध्यवर्ती बँकांचा दरवाढीचा वेग बराच मंद राहील. फेड मूल्यवाढ मंद झाल्याचा सकारात्मक फायदा सोन्याला मिळाला असल्याने डॉलर बळकटीस प्रतिबंध लागेल.

वरील पार्श्र्वभूमी पाहाता भारतीय ग्राहकांनी सोन्याकडे (दागिने) पारंपरिक नजरेतून पाहणे शहाणपणाचे ठरणार नाही. त्यांनी सोन्याला गुंतवणूक मालमत्ता मानले पाहिजे. आपल्याकरिता सोने उपयुक्तच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्याचा भाव मध्यम कालावधीसाठी प्रति औन्स १,३८० ते १,४०० डॉलर दरम्यान राहील. तर स्थानिक बाजारात सोन्याचा तोळ्यासाठी २८,००० ते २८,२०० भाव राहिल्यास तो ३०,५०० ते ३०,८०० रुपयेपर्यंत जाईल. त्यामुळे सणांच्या मुहूर्तावर हा पर्याय पोर्टफोलियोत जोडण्यासाठी अगदी योग्य आहे!

(लेखक मोतीलाल ओसवाल कमोडीटीजच्या वायदा वस्तू विषयाचे विश्लेषक (मौल्यवान धातू विभाग) आहेत.)

First Published on October 10, 2017 3:10 am

Web Title: gold investment financial assets