आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकी चलन – डॉलर कमकु वत झाल्याने तसेच टाळेबंदीत सुरक्षित पर्याय म्हणून ग्राहकांचा खरेदी ओघ वाढल्याने मौल्यवान धातूच्या दरांनी जवळपास दशकातील विक्रमी टप्पा गाठला आहे. भारतात सोन्याने प्रति तोळा ५० हजार रुपयांहून अधिक तर चांदीने किलोमागे ६० हजार रुपयांचा टप्पा पार केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे मूल्य वेगाने खाली गेल्याने सोने प्रति औन्स १,९५० डॉलरपुढे गेले. तर भारतात तोळ्यासाठी सोने दर ५० हजार रुपयांपलीकडे गेला. त्याचबरोबर चांदीचे व्यवहार किलोमागे ६० हजार रुपयांपुढील रकमेत झाले.

सोने दरातील सध्याचा वरचा स्तर

अमेरिके च्या बाजारात २००८ च्या आर्थिक अरिष्टादरम्यानही अनुभवला गेला होता. आरोग्य तसेच वित्तीय पातळीवर जगभरात आव्हानात्मक वातावरण आहे. परताव्याबाबत सोने दोन ते तीन वर्षे अधिक लाभ देत राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूक तसेच मूल्याबाबतचा हा कल काही कालावधीसाठी कायम राहण्याची शक्यता आहे.

– डॉ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष, पीएनजी ज्वेलर्स.