News Flash

सोने २९ हजारांखाली!

भांडवली बाजारात नव नव्या विक्रमाची तेजी सुरू असतानाच, अपेक्षेप्रमाणे सराफा बाजारात मात्र नरमाई पाहायला मिळत आहे.

| March 27, 2014 12:09 pm

भांडवली बाजारात नव नव्या विक्रमाची तेजी सुरू असतानाच, अपेक्षेप्रमाणे सराफा बाजारात मात्र नरमाई पाहायला मिळत आहे. मुंंबईच्या सराफा बाजारात सोने तोळ्यामागे आता २९ हजारांच्याही खाली उतरले आहे.
बुधवारी सराफ बाजारातील व्यवहारात या मौल्यवान धातूच्या १० ग्रॅम वजनाला २८,६६० रुपयांचा भाव मिळाला. मंगळवारच्या तुलनेत त्यात तोळ्यामागे ६७४ रुपयांची घट दिसून आली. कमी झाले. याचबरोबर चांदीचा दरही आता किलोसाठी ४४ हजारांच्या खाली आला आहे. पांढऱ्या धातूचा बुधवारचा दर किलोमागे ८४५ रुपयांनी कमी होत ४३,५०० रुपये झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 12:09 pm

Web Title: gold price fall to 29 thousand
Next Stories
1 कोटक बँकेच्या खात्यातील व्यवहार फेसबुक, ट्विटरमार्फत
2 मामुली फेरफारासह जुनाच प्रस्ताव ‘सहाराश्री’कडून न्यायालयात सादर; जामीन अर्जावर आज सुनावणी
3 अर्थमंत्री म्हणतात.. निर्देशांकांची उच्चांकी उसळी ही यूपीए सरकारच्या कामगिरीची पावती!
Just Now!
X