28 November 2020

News Flash

सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा काय आहेत नवे दर

चांदीच्या दरात २ हजारांपेक्षा अधिक वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ पाहायला मिळाली. मंगळवारी संध्याकाळी मुंबईतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात ३२९ रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर सोन्याचे दर ५१ हजार ५७५ रूपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले. तर दुसरीकडे २२ कॅरेट सोन्याचे दर ४८ हजार ६६० रूपये प्रति दहा ग्रॅम आणि १८ कॅरेट सोन्याचे दर ३९ हजार ७८० रूपये प्रति १० ग्रॅम इतके झाले.

तर दिल्लीतही २४ कॅरेट सोनाच्या दरात ४१८ रूपयांची वाढ पाहायला मिळाली. त्यानंतर दिल्लीत सोन्याचे दर ५२ हजार ९६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. सोन्यासोबतच चांदीच्या मागणीतही मोठी वाढ पाहायला मिळाली. मंगळवारी चांदीच्या दरात २ हाजर २४६ रूपयांची वाढ होऊन ती ७२ हजार ७९३ प्रति किलोवर पोहोचली आहे. सोमवारी सोन्याचे दर ५२ हजार ५४५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ७० हजाप ५४७ रूपये प्रति किलोवर बंद झाली होती.

मंगळवारी मल्टिपल कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. एमसीएक्सवर ऑक्टोबर महिन्यात देण्यात येणाऱ्या सोन्याच्या दरात ०.३७ टक्क्यांची वाढ झाली असून ते ५१ हजार ८९३ रूपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होऊन ते १ हजार ९८८ रूपये प्रति औसवर पोहोचले आहेत. तर चांदीच्या दरातही वाढ होऊन ते २८. ७७ डॉलर्स प्रति औंस वर पोहोचले आहे. तर प्लॅटिनमच्या दरात ०.३ टक्क्यांची वाढ होऊन ते ९३१.८७ डॉलर्स प्रति औंसवर पोहोचले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 8:08 pm

Web Title: gold prices today gold silver prices surge for the third consecutive day know how expensive gold has become indian market jud 87
Next Stories
1 टेलिकॉम कंपन्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; AGR ची रक्कम फेडण्यासाठी १० वर्षांची मुदत
2 जीडीपीचा दर उणे २४ टक्के; चेतन भगत म्हणाले, “तात्काळ…”
3 अर्थव्यवस्थेचा कडेलोट
Just Now!
X