सरकारने गतवर्षी ३० ऑक्टोबरला जाहीर केलेल्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत विक्री केले गेलेल्या रोख्यांमध्ये नियमित खरेदी-विक्री व्यवहारांना येत्या सोमवारपासून राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई)च्या ‘रोख’ विभागात पहिल्यांदाच सुरु होतील.
प्रत्यक्ष सुवर्ण धातू खरेदी न करता सोन्यांत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हा पर्याय असून, भांडवली बाजारात खरेदी-विक्रीची मुभा मिळाल्याने जास्तीत जास्त लोकांचा सहभाग मिळविता येईल, असा विश्वास एनएसईने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. एक ग्रॅम इतक्या किमानतम मात्रेतही सोन्याचे हे व्यवहार यातून शक्य होतील.
सार्वभौम सुवर्ण रोखे हे आठ वर्षांसाठी मुदत बंद असलेले (पाचव्या वर्षांपासून र्निगुतवणुकीची मुभा असलेले) आणि प्रारंभिक गुंतवणूक रकमेवर २.७५ टक्के दराने वार्षिक व्याज लाभ देणारे रोखे आहेत. सोन्याच्या किमतीत वाढीसह, नियमित व्याज असे या रोख्यांचे दुहेरी लाभ असून, तीन वर्षांपश्चात यावर दीर्घ मुदतीचा भांडवली लाभावर करांचे शून्य प्रमाण पाहता, ही गुंतवणूक कर कार्यक्षमही आहे.