News Flash

सोन्याच्या किंमतीला पुन्हा झळाळी; चांदीच्या किंमतीतही वाढ

सराफा बाजारात चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सोन्याच्या किंमतीत शुक्रवारी पुन्हा एकदा वाढ झाली असून चांदीच्या किंमतीनेही उच्चांक गाठला आहे. सराफा बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीने पुन्हा एकदा 38 हजार रूपयांचा टप्पा गाठला आहे. तर चांदीच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत 40 हजार रूपयांचा आकडा पार करेल, अशी शक्यता देशातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

शुक्रवारी दिल्लीत 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध असलेल्या सोन्याच्या किंमतीत 475 रूपयांची वाढ झाली. दरम्यान 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 38,442 रूपये तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 38,250 रूपये प्रति 10 ग्राम झाली. 12 ऑगस्ट रोजी सोन्याची किंनत 38,470 रूपयांवर गेली होती.

तर दुसरीकडे सराफा बाजारात चांदीच्या किंमतीतही 378 रूपयांची वाढ झाली असून चांदीची किंमत 44 हजार 688 रूपये प्रति किलो झाली आहे. दरम्यान, चांदीच्या शिक्क्यांच्याही मागणीत वाढ झाल्याचे पहायला मिळाले. जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याची किंमत 1 हजार 513 डॉलर्स प्रति औंस आणि चांदीची किंमत 17.26 डॉलर्स प्रति औंस झाली आहे. जागतिक अर्थ-राजकीय अनिश्चिततेने समभाग बाजाराला मंदीचे ग्रहण लागले असताना, अशा अस्थिर स्थितीत सुरक्षित आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या सोने-चांदीकडे गुंतवणूकदारांचा होरा वळला आहे. परिणामी सोने-चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतीत निरंतर तेजी गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 2:15 pm

Web Title: gold silver price hike new record on peak jud 87
Next Stories
1 तडाखा उत्पादन-बंदीचा : कंपन्यांकडून कामगारांना सक्तीची रजा
2 अर्थव्यवस्थेपुढे गंभीर आव्हाने ; ‘गोल्डमन सॅक्स’कडून संकटांचा पाढा
3 बाजार-साप्ताहिकी : सावध पवित्रा
Just Now!
X