News Flash

करोना काळातही ‘या’ कंपनीनं वाढवलं कर्मचाऱ्यांचं वेतन; करणार नवी भरती

या महिन्यापासूनच मिळणार वाढीव वेतन

(संग्रहित छायाचित्र)

सध्या देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये देशाचं अर्थचक्र पूर्णपणे ठप्प झालं होतं. तर दुसरीकडे अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात किंवा कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात सुरू असल्याचं समोर आलं होतं. अशातच टाटा कन्सल्टन्सी म्हणजेच टीसीएस या कंपनीनं मात्र महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच वाढीव वेतन १ ऑक्टोबरपासूनच लागू करण्यात येणार आहे. टीसीएसच्या या निर्णयानं कंपनीची प्रतीमा अधिक चांगली झाली आहे.

टीसीएसनं दिलेल्या माहितीनुसार कंपनीनं आतापर्यंत ३ लाख ५२ कर्मचाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं आहे. इतकच नाही तर आयटी सर्व्हिसेसचा आर्टिजन रेट ८.९ टक्के राहिला असून आतापर्यंतचा तो सर्वात कमी आहे. टीसीएसनं केवळ कर्मचाऱ्यांचा वेतन वाढवण्याचा निर्णय घेतला नाही, तर नव्या कर्मचाऱ्यांची भरतीदेखील करण्यात येणार आहे. सध्या कंपनीनं नव्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू केल्याची माहिती कंपनीचे एचआर ग्लोबल हेड मिलिंद कक्कड यांनी सांगितलं. टीसीएसमधअये सध्या ४ लाख ५३ हजार ५४० कर्मचारी कार्यरत आहेत.

यादरम्यान १६ हजार कोटी रूपयांचे शेअर्स बायबॅक करणार असल्याची घोषणाही कंपनीनं यापूर्वी केली होती. हे बायबॅक ३ हजार रूपये प्रति इक्विटी शेअर्सच्या हिशोबानं केले जाणार आहेत. कंपनीच्या संचालक मंडळानंदेखील ५ कोटी ३३ लाख ३३ हजार ३३३ शेअर्सच्या बायबॅकच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. बायबॅक व्यतिरिक्त कंपनी शेअर धारकांना १२ रूपये प्रति शेअर डिविडेंटदेखील देणार आहे. यामुळेच टीसीएसच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 3:37 pm

Web Title: good news amid pandemic tcs announces salary hike for employees effective october 1 dividend for share holders jud 87
Next Stories
1 पतधोरणातून व्याजदरात फेरबदल अशक्य – केअर रेटिंग्ज
2 ‘टीसीएस’कडून १६,००० कोटींची समभाग पुनर्खरेदी योजना
3 दिनेश खरा स्टेट बँक अध्यक्षपदी
Just Now!
X