03 December 2020

News Flash

भारतात Google Pay च्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता; … म्हणून दिले चौकशीचे आदेश

गुगलच्या पाच कंपन्यांची होणार चौकशी

डिजिटल पेमेंट अॅप Google Pay च्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कंपिटिशन कमिशन ऑफ इंडियानं (सीसीआय) ‘गुगल पे’नं कथितरित्या अयोग्य व्यवसाय पद्धतीचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत इंटरनेट क्षेत्रातील दिग्गज कंपनी गूगलच्या विरोधात सखोल तपासाचे आदेश दिले आहेत. “कंपनीने कायद्याच्या कलम ४ मधील विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याचं आयोगाचं प्राथमिक मत आहे,” असं सीसीआयनं आपल्या आदेशात म्हटलं आहे.

नियामकानं या प्रकरणी आपल्या महासंचालकांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ‘गुगल पे’नं कथितरित्या अयोग्य व्यवसाय पद्धतीचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आयोगाच्या कायद्याचं कलम ४ हे एखाद्यानं बाजारात आपल्या वर्चस्वाचा दुरूपयोग केल्यासंबंधी आहे.

पाच कंपन्यांविरोधात तपास

सीसीआयनं अल्फाबेट इंक, गुगल एलएलसी, गुगुल आयर्लंड लिमिटेड, गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. “गुगल सध्या जे काही करत आहे ते अयोग्य आहे आणि त्यांनी भेदभाव करणाऱ्या अटी शर्थी ठेवल्या आहेत. याअंतर्गत, गुगल पेच्या स्पर्धक अ‍ॅप्सना बाजारात प्रवेश प्रदान केला जात नाही, असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे,” असं सीसीआयनं सांगितलं.

कमिशनबाबत चिंता

पैसे देऊन वापरण्यात येणारी अ‍ॅप्स आणि अ‍ॅप्समध्ये असलेल्या कोणत्याही सेवांच्या उपयोगासाठी देण्यात येणाऱ्या पैशांवर ३० टक्के कमिशन देण्याच्या गुगलच्या निर्णयावर भारतीय अ‍ॅप्स विकासकांनी चिंता व्यक्त केली आहे. बर्‍याच विकासकांचे म्हणणे आहे की कंपनी देशांतर्गत अ‍ॅप विकासकांना त्यांच्या डिजिटल सेवा विक्रीसाठी गुगलच्या बिलिंग सिस्टमचा वापर अनिवार्य करण्यास भाग पाडू शकत नाही.

दरम्यान, यानंतर गुगलनंही प्रतिक्रिया देत सीसीआयनं अनेक दाव्यांना फेटाळल्याचा आम्हाला आनंद असल्याचं म्हटलं. गूगल पे अत्यंत स्पर्धात्मक पद्धतीने चालविले जात आहे आणि ग्राहक त्याची सेवा साधी आणि सुरक्षित असल्यामुळे त्याला प्राधान्य देतात हेच त्याचं यश आहे, हे तपासणीदरम्यान दिसून येईल, असंही गुगल पे च्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 8:43 am

Web Title: google comes under cci lens again regulator orders probe into payments system google pay online payment app jud 87
Next Stories
1 सिमेंट कंपन्यांच्या नफेखोर ‘संगनमता’ला पायबंद घालण्यासाठी नियामक प्राधिकरणाची मागणी
2 सेन्सेक्स-निफ्टीचे उच्चांकी शिखर
3 उद्यमशील, उद्य‘मी’ : कुटुंब कलह !
Just Now!
X