सोन्याची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकार आणखी काही उपाययोजना करण्याच्या विचारात असल्याचे केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे सचिव अरविंद मायाराम यांनी म्हटले आहे. याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून बॅंकांकडून होणाऱया सोनेविक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे.
सोन्याच्या आयात-निर्यात धोरणाचा फेरआढावा घेण्याची वेळ आली आहे. सोन्याची आयात कमी करण्यासाठी वेगवेगळी पावले उचलण्यात येणार आहेत. त्यादृष्टीनेच बॅंकांकडून होणाऱया सोन्याच्या नाण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा विचार सुरू असल्याचे मायाराम यांनी सांगितले.
आर्थिक स्थैर्य आणि विकास परिषदेच्या उपसमितीची बैठक रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मायाराम यांनी ही माहिती दिली.