मुंबई : सिरॅमिक टाईल्सची सर्वात मोठी निर्माता एच अ‍ॅण्ड आर जॉन्सन कंपनीने  हरित इमारतीच्या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण आखले असून कंपनीने ‘इंडियन ग्रीन बिल्डिंग’ परिषदेबरोबर व्यावसायिक भागीदारी केली आहे. याअंतर्गत कंपनीने माबरेनेट ब्रॅण्डखाली स्लॅब उत्पादन वर्गवारी (स्लिम स्लॅब), जीव्ही स्लॅब आणि स्नानगृह वर्गवारीत इको फ्लॅश वॉटर सेव्हर सॅनिटरीवेअर दाखल केले आहे. कंपनीने २२५ कोटींच्या गुंतवणुकीतून आंध्र प्रदेशमधील सिलिका जेव्ही केंद्रातील व्हिट्रिफाईड उत्पादनाचाही विस्तार केला आहे, अशी माहिती जॉन्सन बाथरुमचे उपाध्यक्ष अजितसिंग यांनी दिली. येथे कंपनी माबरेनाईट स्लॅब उत्पादने बनविते.