News Flash

विकास दर १२ टक्के!

‘मूडीज’चा चालू वर्षासाठी आशादायक अर्थकल

(संग्रहित छायाचित्र)

 

चालू, वर्ष २०२१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था १२ टक्के वेगाने प्रवास करेल, असा विश्वास मूडीज या अमेरिकी वित्तसंस्थेच्या विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेसाठी पूरक पतधोरण आणि वित्तीय धोरणे निमित्त ठरतील, असे कारण देण्यात आले आहे. जोडीला रिझव्र्ह बँकेचे रेपो दर ४ टक्क्यांखाली येणार नाहीत, असा दावाही करण्यात आला.

गेल्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास उणे ७.१ टक्के राहिला आहे. मात्र नजीकच्या कालावधीत अर्थव्यवस्थेतील उभारीची चिन्हे दिसत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आधीच्या (जुलै-सप्टेंबर २०२०) तीन महिन्यांतील उणे ७.५ टक्क्यांच्या तुलनेत ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० मध्ये भारताचा विकास दर सकारात्मक, ०.४ टक्के राहिल्याकडे मूडीजने लक्ष वेधले आहे. प्राप्तिकरातील कपातीसारख्या सरकारच्या प्रत्यक्ष आर्थिक सुधारणांचा अर्थव्यवस्थेला फारसा हातभार लागणार नाही, अशीही शंका व्यक्त करण्यात आली आहे.

भारताच्या देशांतर्गत, बाहेरील मागणीतही सुधार होत असून टाळेबंदी शिथिलीकरणामुळे हे घडल्याचे आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेचे विश्लेषक नमूद करतात. गेल्या काही महिन्यांपासून देशातील निर्मिती क्षेत्रातही वाढ होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 12:26 am

Web Title: growth rate 12 percent hopeful meaning of moody abn 97
Next Stories
1 ‘एलआयसी’च्या विमाधारकांसाठी दावे सुलभता; नजीकच्या शाखेत प्रक्रिया सुविधा
2 फ्यूचर रिटेल-रिलायन्स व्यवहार अडचणीत
3 पाच दिवसांच्या घसरणीत आठ लाख कोटींची धूळधाण
Just Now!
X