कोळसा, नैसर्गिक वायू आणि खते या देशाच्या प्रगतीत इंधनाचे काम करणाऱ्या घटकांच्या निर्मितीतील घसरणीपायी देशातील एकंदर आठ उद्योगक्षेत्रांचा विकासदरही डिसेंबर २०१२ अखेर २.६ टक्क्यांवर ओसरला आहे. आधीच्या वर्षांतील याच कालावधीत तो ४.९ टक्क्यांवर होता. खनिज तेल, नैसर्गिक वायू, सीमेंट, कोळसा, वीज, पोलाद, पेट्रोलियम रिफायनरी उत्पादने आणि खते ही अर्थव्यवस्थेतील पायाभूत आठ उद्योगक्षेत्रे असून एप्रिल ते डिसेंबर २०१२ अशा नऊ महिन्यांत त्यांच्या प्रगतीला निरंतर ओहोटी लागली आहे. परिणामी सरकारने अर्थव्यवस्थेच्या विकासाचा अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी)तील वृद्धीदरही पूर्वअंदाजित ६.५ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांवर आणला आहे. एप्रिल-डिसेंबर २०१२ नऊमाहीत महत्त्वाच्या आठ उद्योगक्षेत्रांचा विकास अवघा ३.३ टक्के नोंदला गेला, जो आधीच्या वर्षांतील याच नऊमाहीत ४.८ टक्के असा होता.