18 January 2018

News Flash

ऑगस्टचे ‘जीएसटी’ संकलन रोडावले!

नवीन करप्रणाली लागू झाल्याच्या दुसऱ्या महिन्यातील हे चित्र निराशाजनक आहे.

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: September 27, 2017 3:02 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

व्यावसायिक करदात्यांच्या संख्येतही घट

जुलैमध्ये अंमलबजावणी सुरू झाल्यापासून दुसऱ्या महिन्यात वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन रोडावले असून ते ऑगस्टमध्ये ९०,६६९ कोटी रुपये झाल्याचे स्पष्ट होत आहे. जुलै या पहिल्या महिन्यातील ९५,००० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाचे कर संकलन कमी झाले आहे.

नवीन करप्रणाली लागू झाल्याच्या दुसऱ्या महिन्यातील हे चित्र निराशाजनक आहे. कर संकलनाबरोबरच एकंदर विवरणपत्र दाखल करणाऱ्या करदात्यांची संख्याही  घसरली आहे. सरलेल्या महिन्यात ३७.६३ लाख व्यावसायिक करदात्यांनी विवरणे नोंदविली आहेत.

‘जीएसटी’मधील केंद्रीय कर पद्धतीद्वारे १४,४०२ कोटी रुपये तर राज्य करपोटी २१,०६७ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. ‘जीएसटी’ भरपाई अधिभार ७,८२३ कोटी रुपये व आंतरराज्य वस्तू व निर्यातीपोटीचा कर ४७,३७७ कोटी रुपये आहे.

१ जुलै २०१७ पासून देशभरात वस्तू व सेवा कर अर्थात ‘जीएसटी’ची अंमलबजावणी सुरू झाली. पहिल्या महिन्यात ९५,००० कोटी रुपये या माध्यमातून जमा झाले होते. पैकी ‘इनपुट क्रेडिट’पोटी परतावा या रूपात व्यावसायिकांना द्यावी लागणारी रक्कम वजा जाता केवळ १२,००० कोटी रुपयेच सरकारी तिजोरीत जमा होत असल्याचे स्पष्ट झाले होते.

First Published on September 27, 2017 3:02 am

Web Title: gst revenue collection professional tax
  1. No Comments.