18 September 2020

News Flash

हॅवेल्सचा वैयक्तिक निगा बाजारात प्रवेश

अग्रणी फिलिप्सला टक्कर देऊन, २५ टक्के बाजारहिश्श्याचे लक्ष्य

अग्रणी फिलिप्सला टक्कर देऊन, २५ टक्के बाजारहिश्श्याचे लक्ष्य

पंखे आणि प्रकाश उपकरणांच्या क्षेत्रातील प्रमुख उत्पादक हॅवेल्स इंडियाने वैयक्तिक शरीर निगा उपकरणांच्या निर्मितीत प्रस्थापित फिलिप्सला आ्व्हान देऊन शिरकाव बुधवारी जाहीर केला. येत्या दोन वर्षांत २५ टक्के बाजारहिस्सा काबीज करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

वैयक्तिक निगा उपकरणांची मालिका हॅवेल्स इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष सौरभ गोएल यांनी बुधवारी येथे प्रस्तुत केली. या प्रसगी कंपनीचे उपाध्यक्ष टॉम जोसेफ आणि अनिल शर्मा उपस्थित होते. पुरुष व महिलांसाठी इलेक्ट्रॉनिक शेव्हर्स, ट्रिमर्स आणि एपिलेटर्ससह वेगवेगळे १७ गॅझेट्सचे या प्रसंगी अनावरण करण्यात आले. फिलिप्सचा या उत्पादन वर्गामध्ये बाजारात वरचष्मा आहे. या उपकरणांचे उत्पादन चीन, हाँगकाँग आणि तैवानमधील उत्पादकांकडून घेतले जाणार असून हॅवेल्स त्यांची भारतात विक्री करणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 1:55 am

Web Title: havells phillips
Next Stories
1 ईएलएसएस कर वजावट आणि करमुक्त संपत्ती निर्माणाचे तिहेरी लाभ
2 ‘डिस्कव्हरी’चा नवीन क्रीडा वाहिनीसह भारतात विस्तार
3 डेबिट कार्डधारकांसाठी खूशखबर!; व्यवहारांवरील शुल्क होणार कमी
Just Now!
X