News Flash

हावरेंचा कल्याणजवळ परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प

नवी मुंबई आणि ठाण्यात अनेक परवडणाऱ्या किमतीतील ‘नॅनो हाऊसिंग’ प्रकल्प यशस्वी करणाऱ्या हावरे बिल्डर्सकडून कल्याणजवळ मुठवळ येथे याच धर्तीचा ‘हावरे

| January 15, 2015 12:30 pm

नवी मुंबई आणि ठाण्यात अनेक परवडणाऱ्या किमतीतील ‘नॅनो हाऊसिंग’ प्रकल्प यशस्वी करणाऱ्या हावरे बिल्डर्सकडून      कल्याणजवळ मुठवळ येथे याच धर्तीचा ‘हावरे पिनॅकल’ प्रकल्प आकार घेत आहे.
एक आणि दोन बीएचके श्रेणींची ही नॅनो घरे परवडणाऱ्या किमतीत आणि तरीही बांधकामाच्या गुणवत्तेत कुठलीही तडजोड न करता व आधुनिक जीवनशैलीला साजेशा स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, अ‍ॅम्फी थिएटर, लायब्ररी, जिम, चिल्ड्रन प्ले एरिया, लॅण्डस्केप गार्डन, इनडोअर गेम्स रूम अशा अत्याधुनिक सोयींसह उपलब्ध झाली आहेत, असे हावरे बिल्डर्सचे संचालक अमित हावरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कल्याण स्थानकापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या हावरे पिनॅकलमध्ये घरासाठी २५ हजार रुपये भरून बुकिंग करण्याचे आवाहन करताना, त्यांनी २२ ते २९ जानेवारी दरम्यान किमतीत भरघोस सवलत देणाऱ्या विशेष शुभारंभी सप्ताहाचीही घोषणा केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 12:30 pm

Web Title: hawre hometown at kalyan
Next Stories
1 टीबीझेडशी ‘फ्रँचाइझी’ भागीदारीची उद्योजकांना संधी
2 हवालाद्वारे व्यवहार केल्याची बिर्ला समूहातील वित्तीय अधिकाऱयाची कबुली
3 रिझर्व्ह बॅँकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची घट, गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता
Just Now!
X