23 October 2020

News Flash

अभ्युदय बँकेची आरोग्य विमा सेवा

हेल्थ इन्श्यूरंस कंपनीच्या सहकार्याने बँक खातेदार/ग्राहकांकरिता आरोग्य विमा सेवा सुरू केली आहे.

सहकारी क्षेत्रातील आघाडीच्या अभ्युदय बँकेने रेलिगेअर हेल्थ इन्श्यूरंस कंपनीच्या सहकार्याने बँक खातेदार/ग्राहकांकरिता आरोग्य विमा सेवा सुरू केली आहे. अभ्युदय बँक ही भारतीय जीवन विमा महामंडळ व न्यू इंडिया अ‍ॅश्युरंस कंपनीची कंपनी प्रतिनिधी असून जीवन विमा व सर्व साधारण विमा पॉलिसी सर्व शाखांमधून उपलब्ध करुन दिल्या गेल्या आहेत. बँकेचे सध्या १ लाख ८२ हजांराहून जास्त भागधारक असून १८ लाख ग्राहक आहेत. बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार सिताराम घनदाट, उपाध्यक्ष नित्यानंद प्रभू, व्यवस्थापकीय संचालक विजय मोय्रे, महाव्यवस्थापक पुनितकुमार शेट्टी तसेच रेलिगेअर हेल्थचे रिटेल हेड अजय शहा, कॉर्पोरेट सेल्सचे सहाय्यक उपाध्यक्ष गौरव मुनिम यांनी या व्यवसाय भागीदारी व्यवहाराकरिता सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 3:27 am

Web Title: health insurance services by abhyudaya coop bank
Next Stories
1 ‘शॉपमॅटिक’ सुरु करणार ई-कॉमर्स व्यासपीठ
2 उणे महागाई यंदाही कायम
3 तेजी कायम!
Just Now!
X