सरलेल्या २०७० संवत्सरात (२०१३-१४) मध्ये र्मचट बँकर्सच्या श्रेणीत सवरेत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार हेम सिक्युरिटीजने मुंबई शेअर बाजार-‘बीएसई’ने आयोजित केलेल्या सोहळ्यात पटकावला. हेम सिक्युरिटीज्ने या कालावधीत बीएसईच्या एसएमई मंचावर सर्वाधिक प्रारंभिक भागविक्री (आयपीओ)ची प्रक्रियेत व्यवस्थापकीय मध्यस्थाची भूमिका बजावली आहे. हेम सिक्युरिटीजचे संचालक गौरव जैन यांनी बीएसईचे मुख्याधिकारी आशीष चौहान यांच्या हस्ते स्वीकारला. शेअर बाजारात नवीन वैयक्तिक गुंतवणूकदारांना सर्वाधिक आकर्षित करण्यात भूमिका बजावणाऱ्या मनीप्लेक्स सिक्युरिटीज्ला या सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी स्थापित या कंपनीने अनेक प्रस्थापितांना मागे सारत हा पुरस्कार पटकावल्याबद्दल मनीप्लेक्सचे व्यवस्थापकीय संचालक विराज चोडणकर यांनी आपल्या मनोगतात आनंद व्यक्त केला.