News Flash

नामको बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत धात्रक

उत्तर महाराष्ट्रात अग्रणी असणाऱ्या दि नाशिक मर्चन्टस् को-ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत धात्रक यांची बिनविरोध निवड झाली.

मुंबई : उत्तर महाराष्ट्रात अग्रणी असणाऱ्या दि नाशिक मर्चन्टस् को-ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत धात्रक यांची बिनविरोध निवड झाली. बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात बैठकीत ज्येष्ठ संचालक वसंत गिते यांनी धात्रक यांचे नाव सुचविले व ज्येष्ठ संचालक सोहनलाल भंडारी यांनी त्यास अनुमोदन दिले.

प्रशासकीय काळात बँकेच्या अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण ३८ टक्के होते; मात्र आता ते शून्य टक्के (निव्वळ एनपीए) आहे. नामको बँकेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी बँकेची एक परिषद लवकरच आयोजित करण्यात येईल व त्यात बँकेचे प्रश्न येणाऱ्या अडीअडचणी या विषयावर चर्चा करण्यासाठी बँकींग क्षेत्रातील मान्यवर सर्व पक्षांचे नेते सहकार तज्ज्ञ यांना निमंत्रित करून सहकारी बँकांविषयी सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती धात्रक यांनी दिली. या प्रसंगी उपाध्यक्ष हरिष लोढा, जनसंपर्क संचालक रजनी जातेगांकर, संचालक वसंत गिते, सोहनलाल भंडारी, प्रकाश दायमा, शिवदास डागा, सुभाष नहार, अशोक सोनजे, गौतम सुराणा, पुंजाभाऊ सांगळे, राजाभाऊ डोखळे, पंढरीनाथ थोरे, आदींची भाषणे झाली. याप्रसंगी माजी अध्यक्ष हरिभाऊ धात्रक, तानाजी जायभावे, प्रभाकर धात्रक, संचालक अविनाश गोठी, कांतीलाल जैन, रंजन ठाकरे, गणेश गिते, प्रफुल्ल संचेती, नरेंद्र पवार, महेंद्र बुरड, संतोष धाडीवाल, सौ शोभाताई छाजेड, प्रशांत दिवे, अरूणकुमार मुनोत, शेख गफार शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिगुण कुलकर्णी, प्रसाद सौंदाणे, कल्पेश पारख तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 3:14 am

Web Title: hemant dhatrak chairman namco bank ssh 93
Next Stories
1 टाटा डिजिटलची क्युरीफिटमध्ये ७.५० कोटी डॉलरची गुंतवणूक
2 सेंट्रल बँक ऑफ इंडियाला तिमाही निकालांबाबत दिलासा
3 यंदाही व्याजदर स्थिरच!
Just Now!
X