News Flash

हीरोच्या बाईक ३० हजाराच्या आत?

‘नॅनो’च्या रुपात रतन टाटा यांचे स्वस्तातील कारचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत असतानाच्या कालावधीत कमी किंमतीतील मोटरसायकलचा ध्यास घेणाऱ्या पवन मुंजाल यांचा स्वस्तातील मोटरसायकल निर्मितीचा मार्ग प्रत्यक्षात

| July 2, 2013 12:01 pm

‘नॅनो’च्या रुपात रतन टाटा यांचे स्वस्तातील कारचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत असतानाच्या कालावधीत कमी किंमतीतील मोटरसायकलचा ध्यास घेणाऱ्या पवन मुंजाल यांचा स्वस्तातील मोटरसायकल निर्मितीचा मार्ग प्रत्यक्षात मोकळा होऊ लागला आहे. अमेरिकेतील एरिक ब्युएल रेसिंगमधील (ईबीआर) निम्मा हिस्सा खरेदीच्या व्यवहाराला हीरो मोटोकॉर्पने (एचएमसी) सोमवारी पूर्णविराम दिला. देशातील पहिल्या क्रमांकाच्या दुचाकी निर्मिती कंपनी हीरो मोटोकॉर्पने एरिक ब्युएल रेसिंग कंपनीतील ४९.२ टक्के हिस्सा १४८ कोटी रुपयांना खरेदी केला आहे. आर्थिक व्यवहारातील पहिला टप्पा यापूर्वीच पार पडला आहे. एखाद्या विदेशातील कंपनीतील थेट समभाग खरेदीच्या माध्यमातून हीरोने प्रथमच भारताबाहेर व्यवहार केला आहे. उभय कंपन्यांमार्फत भारतासह विदेशातही वाहन निर्मिती, विक्री तसेच विपणन सहकार्य लाभण्याबरोबरच ३० हजार रुपयांच्या घरातील मोटरसायक निर्मिती करणे हीरोला सहज शक्य होणार आहे. कमी किंमतीतील दुचाकी निर्मितीची घोषणा यापूर्वी इंडिया यामाहा कंपनीनेही केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2013 12:01 pm

Web Title: hero bike under 30 thousand
टॅग : Business News
Next Stories
1 टोनी-टाटांचा ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज
2 सरकारने वायूदर वाढीची धमक दाखविली
3 वायू उत्पादनाचे दर वाढले तरी..
Just Now!
X