अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत राज्याचा २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. १ तास ४० मिनिटांच्या आपल्या भाषणात मुनगंटीवार यांनी विविध घोषणा, प्रकल्प आणि त्यासाठीच्या तरतूदींसोबत राज्याच्या इत्यंभूत परिस्थितीचे वर्णन केले.

अर्थमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे-

  • यंदाचा अर्थसंकल्प शेतकऱयांना समर्पित.
  • शेतकरी स्वाभिमान वर्ष म्हणून यंदाचे वर्ष साजरे करणार.
  • शेतक-यांसाठी २५ हजार कोटींची भरीव तरतूद.
  • निसर्गाच्या लहरीपणामुळे गेली तीन वर्ष राज्यात दुष्काळ.
  •  ‘जलयुक्त शिवार’ योजनेसाठी १ हजार कोटींची तरतूद.
  •  विद्युतपंप जोडणीसाठी २ हजार कोटी.
  •  मत्स्य संवर्धनासाठी १५० कोटींची तरतूद.
  •  पीकविम्यासाठी १ हजार ८८५ कोटी.
  •  राज्यात अकोला आणि जळगावात पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करणार.
  •  प्रत्येक जिल्ह्यातून तीन आदर्श शेतकऱयांची निवड करून त्यांना अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार.
  •  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सव साजरा केला जाणार.
  •  सेंद्रीय शेतीला चालना देणे काळाची गरज.
  •  कृषी गुरूकूल योजना सुरू करणार, सुधीर मुनगंटीवारांची घोषणा.
  •  पालकमंत्री पाणंद रस्ते दुरूस्ती योजनेसाठी १०० कोटी.
  •  प्रत्येक जिल्ह्यात सक्षम हवामान केंद्र उभारण्याचा प्रयत्न.
  •  नाबार्डच्या सहाय्याने दुग्धोत्पादन प्रकल्प सुरू करणार.
  •  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राबविण्यात येणार.
  •  राज्यातील गाईंच्या संवर्धनासाठी ‘गोवर्धन गोरक्षा केंद्र’ उभारणार.
  •  जलजागृतीसाठी आणि जलसाक्षरता यासाठी प्रशिक्षण केंद्रे उभारणार, मुनगंटीवारांची घोषणा.
  •  साठवण-प्रक्रिया उद्योगांसाठी २५ टक्के अनुदान.
  •  ग्रामीण पाणी-पुरवठा योजनेसाठी ५०० कोटींची तरतूद.
  •  राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी १७० कोटी.
  •  ९ रेल्वे प्रकल्पांसाठी ९ कोटी ६८ लाख कोटी.
  •  वीजनिर्मितीसाठी ७८४ कोटींची तरतूद.
  •  वीज वितरणासाठी ३०१ कोटींची तरतूद.
  •  सुमतीबाई सुकळीकर महिला सक्षमीकरण योजना राबवणार.
  •  स्व.शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीच्या रकमेत वाढ व प्रतिपुर्तीच्या नियमात कुटुंबियांचा समावेश.
  •  जलसिंचनासाठी ७ हजार ८५० कोटींची तरतूद, मुनगंटीवारांची घोषणा.
  •  सधन कुक्कुट विकास गट स्थापन करणार, त्यासाठी ५० कोटींची तरतूद.
  •  मुद्रा बँक योजनेचा प्रचार आणि प्रसार करून बेरोजगार तरुणांना मदत करणार.
  •  मुद्रा बँक कर्ज पुरवठा जिल्हास्तरीय समितीचे गठण. २० कोटींची तरतूद
  •  वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकल्प, २६५ कोटींची तरतूद.
  •  १ जुलै कृषी दिन व वन महोत्सवानिमित्त राज्यात एकाच दिवशी २ कोटी वृक्ष लागवड
  •  रस्ते बांधकामासाठी ४ हजार ५० कोटी रुपये.
  •  भिवंडी, शिळफाटा उन्नत मार्गासाठी ४० कोटींची तरतूद.
  •  रस्त्यांचे दुपदरीकरण आणि चौपदरीकरणासाठी ५५० कोटींची तरतूद.
  •  महाराष्ट्र उद्योजकता परिषदेची स्थापना करण्यात येणार.
  •  मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी ५०० कोटींची तरतूद.
  •  महामार्गांवर नवे ४०० स्वच्छतागृह, त्यासाठी ५० कोटींंची तरतूद.
  •  वीज दरातली सवलतीसाठी १ हजार कोटींची तरतूद.
  •  २०२२ पर्यंत सर्वांसाठी घर, त्यासाठी ७०० कोटींची तरदूत.
  •  २१ हजार किमीचे रस्ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधणार.
  •  बेघर व निराधार स्वातंत्र्य सैनिकांसाठी प्रत्येकी १० लाख.
  •  मुंबई, नवी मुंबई, नागपूर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे या गर्दीच्या ठिकाणी केवळ महिलांच्या प्रवासासाठी खास वेगळ्या बसेस उपलब्ध करून देण्यात येणार.
  •  मुंबईत विभागीय क्रिडा संकुल उभारण्यात येणार.
  •  पोलिसांच्या घरांसाठी ३२० कोटींची तरतूद.
  •  संजय गांधी निराधार योजना , श्रावणबाळ योजना व सामाजिक अर्थसहाय्याच्या इतर योजनांच्या अनुदानात वाढ – निराधारांना आधार
  •  अमरावतीच्या हनुमान व्यायाम संस्थेसाठी १ कोटी.
  •  नागपूर मेट्रोसाठी १८० कोटी देणार.
  •  शिर्डी,अकोला,कराड,चंद्रपूर येथील विमानतळांचा विकास करण्यात येणार.
  •  निसर्ग संरक्षणासाठी ४७ कोटी.
  •  समुद्र किनाऱयालगतच्या कांदळवन संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रतिष्ठान स्थापन करण्यात येणार.
  •  सर्व शिक्षा अभियानासाठी ७४० कोटींची तरतूद.
  •  नमामी चंद्रभागा अभियानाअंतर्गत चंद्रभागा नदीचे संवर्धन आणि प्रदुषणमुक्त करण्यात येणार.
  •  अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत १ हजार ३२ कोटींची तरतूद.
  •  पर्यटन स्थळांच्या विकासाठी आवश्यक उपाय योजना.
  •  नाट्यकला संवर्धनासाठी राज्य बालनाट्य स्पर्धेत दिल्या जाणाऱय़ा पुरस्कारांच्या रकमेत वाढ.
  •  यंदा १० हजार अंगणवाड्या आदर्श अंगणवाड्या करणार. त्यासाठी १०० कोटींची तरतूद.
  •  अंगणवाडी सेविकांना २ लाखांचा आरोग्य विमा आणि २ लाखांचा जिवन विमा.
  •  राज्य परिवहन मंडळ निवारे आधुनिक करणार.
  •  मुंबईतील मेट्रो प्रकल्पासाठी ९० कोटींची तरतूद.
  •  ग्रामीण आरोग्यासाठी ३२० कोटी.
  •  नागपूर मेट्रोसाठी १८० कोटी रुपये देणार.
  •   ऐका माझ्या भगिनींनो नाही तुम्ही निराधार, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे सरकार- सुधीर मुनगंटीवार.
  •  निराधार आणि विधवा महिलांसाठी ३३२ कोटींची तरतूद.
  •  बाबासाहेबांच्या जन्म शताब्दीसाठी १७० कोटींची तरतूद.
  •  अल्पसंख्याक समाज उन्नतीसाठी १०५ कोटी.
  •  स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत व महिला सक्षमिकरण अभियानासाठी १ हजार कोटींची तरतूद.
  •  आर.आर.पाटील यांच्या स्मरणार्थ सांगलीत भव्य सभागृह बांधण्यात येणार, त्यासाठी ५ कोटी.
  •  भास्कराचार्य यांच्या स्मरणार्थ राज्यात गणितनगरी स्थापन करण्याचा मानस.
  •  अनुसुचित जातीच्या शेतक-यांना विहिरीसाठी २ लाखांचं अनुदान.
  •  पंडित दीनदयाळ उपाध्याय कृषि मार्गदर्शक योजना सुरू करणार.
  •  आदिवासींच्या वारली कलेला प्रोत्साहन देण्यासाठी ६० कोटींची तरतूद
  •  लोकमान्य टिळकांच्या विविध उपक्रमांसाठी ५ कोटींची तरतूद.
  •  राज्याबाहेर शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी ५ कोटांची तरतूद
  •  मुंबईतील ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमानंतर महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षमतेचे जगाला दर्शन
  • राज्य शासनाच्या नविन औद्योगीक धोरणामुळे जानेवारी २०१६ पर्यंत ८४९७ प्रकल्पांनी उत्पादन सुरु केले आहे. यात २,६२,६३१ कोटी रु. ची गुंतवणूक करण्यात आली आहे, ११.२३ लाख थेट रोजगार निर्मिती.
  •  ई-कॉमर्सची माहिती न देणऱया कंपन्यांना दंडाची तरतूद.
  • आपले सरकार पोर्टल मार्फत १५६ सेवा ऑनलाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
  •  विक्रीकर आणि इतर कर सोपी करण्याचा विचार.
  •  लॉटरी योजनेसाठीचा करण सव्वा लाखाहून दीड लाख करणार.
  •  सीआरपीएफ आणि एसआरपीएफ कर्मचाऱयांना कर सूट.
  •  व्हॅटमध्ये ०.५ टक्के वाढ करण्याचा सरकारचा निर्णय.
  •  बेदाणे आणि मनुक्यावरील कर सवलत यंदाच्या वर्षातही सुरू राहणार.
  •  आयटी क्षेत्रासाठी डेटा सेंटर आणि सर्व शासकीय केंद्रांना जोडण्यासाठी १० कोटी तरतूद.
  •  हॉटेलमध्ये वापरण्यात येणाऱया टॉवेलवर कर
  •  एलईडी ट्युबलाईटवरील करात सवलत.
  •  खोबरेल तेलावर १२.५ टक्के कर लागणार.
  •  इंजेक्शनमध्ये वापरण्यात येणाऱया निर्जंतुकीकरण पाण्यावरील करात सवलत.
  •  वापरलेल्या वाहनांच्या विक्रीवरील कर १२.५ टक्क्यावरून ५ टक्क्यावर.
  •  गणिताच्या सर्व साहित्यावरील करण १२.५ टक्क्यावरून ५ टक्क्यावर.
  •  बॅटरी, सौरउर्जेवरील वाहनांवर ५ टक्के कर माफ.
  •  बांबूपासून बनविलेल्या फर्निचरला पूर्णपणे करमाफी.
  •  पेट्रोल, डिझेल, सिगारेटवरील कर कायम.
  •  संरक्षण तारेवरील कर १२.५ टक्क्यारून ५ टक्क्यावर.
  •  साखर दराच्या नियंत्रणासाठी ऊस खरेदीकर माफ.
  • नविन पर्यटन धोरण जाहीर, यासाठी रु. २८५ कोटी, औरंगाबाद परीसरातील म्हैसमाळ, वेरूळ, सुलिभंजन पर्यटन विकासावर विशेष लक्ष
  • राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजनेसाठी रु. ३०० कोटी
  • कोकणातील विविध ५ जिल्हयातील जेट्टी विकास कार्यक्रमासाठी रु. ३० कोटी