26 February 2021

News Flash

ऐतिहासिक भाव ठरला मैलाचा दगड

तोळ्यासाठी ३२ हजारापुढील भाव सोने धातूने कधी नव्हे तर तो सरत्या वर्षांत दाखविला, बरोबरीने चांदीनेही किलोसाठीचा ७५ हजारावर मारलेल्या मजलही २०१२ चे वैशिष्टय़ ठरले. सोन्याचे

| December 25, 2012 04:12 am

तोळ्यासाठी ३२ हजारापुढील भाव सोने धातूने कधी नव्हे तर तो सरत्या वर्षांत दाखविला, बरोबरीने चांदीनेही किलोसाठीचा ७५ हजारावर मारलेल्या मजलही २०१२ चे वैशिष्टय़ ठरले. सोन्याचे दर ३० हजारांच्या खाली आता नजीकच्या टप्प्यात तरी येणार नाहीत, या अंदाजाने खरेदीदारांचा सुवर्ण-हव्यास कमी होण्याऐवजी वाढलेलाच दिसून आला.
दागिन्यांपेक्षा गुंतवणूक म्हणून सोने खरेदीच्या वाढता कल केंद्र सरकारसाठी या वर्षांच्या सुरुवातीपासूनच धोक्याचा ठरला. वाढत्या वित्तीय तुटीवर बोजा टाकणाऱ्या गुंतवणुकीच्या या सर्वात आकर्षक पर्यायावर मग अर्थसंकल्पापूर्वीही करवाढीचा भार टाकण्यात आला. तसा हा प्रयोग २०११ च्या मावळतीलाही झाला होता. २०१२ मध्ये वेळोवेळी सोने-चांदीचे दागिने, धातू यावरील बदलत्या कर रचनेने तमाम सराफा व्यावसायिकही चिंतीत झाले होते.
२०११ च्या तुलनेत यंदा सोने खरेदीसाठी आवश्यक असणाऱ्या इतर मुहूर्तासह लग्नाचा मोसमही विस्तारित होता. त्यातच सोने वापरावरील रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणावरूनही फास आवळले गेले.
असे असले तरी या शुद्ध व मौल्यवान धातूने ऐतिहासिक ३२ हजाराचा भाव गाठण्याची किमया याच, २०१२ मध्ये केली. नोव्हेंबरमध्ये ऐन दिवाळसण असताना मुंबईत १० ग्रॅम सोन्याचा दर प्रथमच ३२,५३० च्या पुढे गेला. तर राजधानी दिल्लीतही सोने याच दरम्यान ३३ हजाराला (रु. ३२,९७५) जाऊन भिडले होते.
२२ डिसेंबपर्यंत सोने दर लक्षात घेतले तर त्यात तोळ्यामागे ३,४४० रुपयांची भर पडली आहे. वार्षिक तुलनेत ही वाढ १२.५४% होती. २०११ मध्ये आधीच्या वर्षांच्या तुलनेत सोने दर ३२.०९% म्हणजेच ६,६०५ रुपयांनी स्वस्त झाले होते.
२०१२ च्या जूनमध्ये सोने दराने तोळ्यासाठी प्रथमच ३० हजाराचा आकडा अनुभवला. तर सप्टेंबरमध्ये ते ३२ हजार या अभूतपूर्व टप्प्यावर गेले. तर दोनच महिन्यात नव्या उच्चांकाला. २०११ च्या अखेरिस सोने २७,१९० रुपयांवर होते. २२ डिसेंबर २०१२ पर्यंत त्यात १२.६५% वाढ झाली आहे.
सोने धातूप्रमाणे चांदीनेही २०११ च्या तुलनेत यंदा कमी चकाकी अनुभवली. उन्हाळ्यातील लग्नाचे मुहूर्त सुरू होण्याआधीच हा पांढरा हा धातू किलोसाठी ६५ हजारांपर्यंत जाऊन भिडला होता. यापूर्वी चांदी २५ एप्रिल २०११ मध्ये सर्वोच्च अशा ७५,०२० रुपयांवर गेले होते. तरी त्यावेळच्या ‘चांदीकरां’ची धास्ती २०१२ मध्येही शमलेली नाही. २२ डिसेंबर २०१२ पर्यंत चांदी १४.१७% ने विस्तारत गेल्याने वार्षित तुलनेत ती ७,२२० रुपयांनी महाग झाली.
आंतराष्ट्रीय स्तरावर सोने प्रती औन्सला १,७०० डॉलर या अनोख्या पातळीवर जून २०१२ मध्येच पोहोचले होते. युरो झोनच्या वाढत्या वित्तीय संकट तसेच युरो चलनाचे अधिक कमकुवत होणे यामुळे जागतिक स्तरावर महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या लंडनमध्ये सोने या उंचीवर पोहोचले होते. तरीदेखील सप्टेंबर २०११ मधील सर्वोच्च सोनेदराची सर अजून २०१२ ने आंतरराष्ट्रीय पातळीवर तरी पाहिलेली नाही.    
भाव विक्रम
       सोने                       चांदी
३२,५३० रु./ १० ग्रॅम                   ७५,०२० रु./ किलोग्रॅम
२७ नोव्हेंबर २०१२              २५ एप्रिल २०११

सोने दराचा २०१२ मधील प्रवास
रु. २७,२०५    रु. ३०,०००    रु.३२,०००    रु.३२,५३०    रु. ३०,६३०
जानेवारी             जून               सप्टेंबर     नोव्हेंबर      डिसेंबर

रिझव्‍‌र्ह बँके खुल्या बाजारातून ८,००० कोटी रुपये उभारणार आहे. यासाठी येत्या २८ डिसेंबर रोजी सरकारी रोख्यांच्या माध्यमातून यासाठी व्यवहार होतील. देशाच्या अर्थव्यवस्थेतील रोकड चणचण यामुळे काही प्रमाणात शिथील होईल.
– डॉ. डी. सुब्बराव,‘रिझव्‍‌र्ह बँके’चे गव्हर्नर (सोमवारी मुंबईत)

सेन्सेक्स
१९२५५.०९
१३.०९
निफ्टी
५८५५.७५
८.०५
वधारले
टाटा मोटर्स    २.४४%
विप्रो    १.७८%
सन फार्मा    १.४६%
इन्फोसिस    १.१५%
टाटा पॉवर    १.०९%
घसरले
जिंदाल स्टील    -१.९३%
ओएनजीसी    -१.८८%
मारुती सुझुकी    -१.६०%
स्टरलाईट इंड.    -१.५८%
रिलायन्स    -०.३६%

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 4:12 am

Web Title: history full rate difine as bad sign
Next Stories
1 किंगफिशरकडून व्यवसाय आराखडा सादर;
2 ‘फिस्कल क्लिफ’
3 म्यानमारमधील तेल व वायू क्षेत्रात भारतीय उद्योगांना संधी
Just Now!
X